Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिगर सबसिडीचा गॅस ४३.५0 रुपयांनी स्वस्त

बिगर सबसिडीचा गॅस ४३.५0 रुपयांनी स्वस्त

विना सबसिडीचा गॅस गुरुवारी स्वस्त झाला. १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ४३.५0 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

By admin | Updated: January 1, 2015 23:57 IST2015-01-01T23:57:25+5:302015-01-01T23:57:25+5:30

विना सबसिडीचा गॅस गुरुवारी स्वस्त झाला. १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ४३.५0 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Non-subsidized gas is priced at Rs 43.50 | बिगर सबसिडीचा गॅस ४३.५0 रुपयांनी स्वस्त

बिगर सबसिडीचा गॅस ४३.५0 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : विना सबसिडीचा गॅस गुरुवारी स्वस्त झाला. १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ४३.५0 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्यामुळे ही दरकपात करण्यात आली आहे. सबसिडीच्या गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तेल विपनन कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या किमती २00९ सालातील किमतीच्या पातळीवर गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातही दरकपात करण्यात येत आहे. त्यानुसार, बिगर सबसिडीच्या १४.२ किलो सिलिंडरची किंमत आता ७0८.५0 रुपये करण्यात आली आहे. आधी ती ७५२ रुपये होती.
बाजारभावाने विकल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातील ही सलग पाचवी कपात आहे. ग्राहकांना १२ गॅस सिलिंडर सबसिडीवर म्हणजेच बाजातील किमतीपेक्षा कमी किमतीत दिले जातात.

सबसिडीवरील सिलिंडरची राजधानी दिल्लीतील सध्याची किंमत ४१७ रुपये आहे. या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.या आधी १ डिसेंबर रोजी बिगर सबसिडीच्या सिलिंडरची किंमत ११३ रुपयांनी कमी करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांच्या काळात सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत २१४ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

Web Title: Non-subsidized gas is priced at Rs 43.50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.