नवी दिल्ली : मोबाईल हँडसेटच्या बाजारात एकेकाळी अनभिषिक्तसम्राट मानल्या जाणाऱ्या नोकिया कंपनीने अखेर नियोजनानुसार चेन्नई येथील प्रकल्प बंद केला आहे. १ नोव्हेंबरपासून तेथील प्रकल्पातून उत्पादन १०० टक्के बंद केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
स्मार्ट फोनच्या आगमनानंतर स्पर्धेत टिकू न शकलेल्या नोकिया कंपनीचा एप्रिल महिन्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने ताबा घेतला होता.
त्यानंतर जगभरातील अनेक ठिकाणी असलेल्या नोकिया कंपनीच्या प्रकल्पांना बंद करण्याचा किंवा तेथील कामाचे स्वरूप बदलण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने जाहीर केला होता. याच अनुषंगाने २५ एप्रिल रोजी मायक्रोसॉफ्टने चेन्नई येथील प्रकल्प १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णयही जाहीर केला होता. मात्र, तामिळनाडू सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला कर भरणा करण्यासंदर्भात नोटिस जारी केली होती. त्यामुळे हा विषय प्रलंबित होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नोकियाने भारतातून गाशा गुंडाळला
मोबाईल हँडसेटच्या बाजारात एकेकाळी अनभिषिक्तसम्राट मानल्या जाणाऱ्या नोकिया कंपनीने अखेर नियोजनानुसार चेन्नई येथील प्रकल्प बंद केला आहे
By admin | Updated: November 3, 2014 03:08 IST2014-11-03T03:08:50+5:302014-11-03T03:08:50+5:30
मोबाईल हँडसेटच्या बाजारात एकेकाळी अनभिषिक्तसम्राट मानल्या जाणाऱ्या नोकिया कंपनीने अखेर नियोजनानुसार चेन्नई येथील प्रकल्प बंद केला आहे
