नवी दिल्ली : दर्जेदार जीवन/राहणीमानाच्या निकषांत भारतातील एकही शहर जगातील पहिल्या १०० शहरांत स्थान मिळवू शकलेले नाही.
मर्सर या सल्लागार कंपनीने केलेल्या १९व्या राहणीमानाचा दर्जा पाहणीत जगात २३१ शहरांना दर्जा (रँकिंग) दिला असून, त्यात हैदराबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि नवी दिल्ली या शहरांचा समावेश १५० क्रमांकापेक्षा खाली आहे.
भारत सरकारने चांगल्या राहणीमानासाठी १०० शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा पुढाकार घेतला असून, आता त्या पुढाकाराचा दुसरा वर्धापन दिन जवळ येत असताना वरील निष्कर्ष जाहीर झाला आहे. शहरांची व्यवस्था पाहणारे व स्थानिक प्रशासनाला संवेदनशील बनविण्यास देशातील सगळ्या शहरांसाठी केंद्र सरकार राहणीमानाचा सूचकांक (लिव्हेबिलिटी इंडेक्स) तयार करीत आहे. आशियामध्ये दर्जेदार राहणीमानाच्या निकषांच्या यादीत सिंगापूरचे स्थान वरचे आहे. तेथील राहणीमान व पायाभूत सुविधा या अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. तरीही जगात त्याचा दर्जा २५वा क्रमांक आहे. आॅस्ट्रियातील व्हिएन्ना जगात राहण्यास अत्यंत उत्तम शहर ठरले. सलग आठव्यांदा त्याने हा मान पटकावला. बगदाद शहर राहण्यास अत्यंत वाईट ठरले आहे. मर्सर कंपनीच्या या पाहणीतील निष्कर्षांचा उपयोग कंपन्या आणि संघटनांना आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई आणि हार्डशिप अलाउन्सेस निश्चित करण्यासाठी होतो.
भारताचे एकही शहर राहण्यास दर्जेदार नाही
दर्जेदार जीवन/राहणीमानाच्या निकषांत भारतातील एकही शहर जगातील पहिल्या १०० शहरांत स्थान मिळवू शकलेले नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:53 IST2017-03-16T00:51:31+5:302017-03-16T00:53:18+5:30
दर्जेदार जीवन/राहणीमानाच्या निकषांत भारतातील एकही शहर जगातील पहिल्या १०० शहरांत स्थान मिळवू शकलेले नाही.
