डक्यात मारला फ्लॉवरपॉट : पुण्यात उपचार सुरू लोणी काळभोर : मागसवर्गीय निधी खर्च करण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर ग्रामपंचायत सदस्याने सरपंचाच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारल्यामुळे कोरेगाव मूळचे सरपंच गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली. या प्रकरणी सरपंच प्रमोद कृष्णाजी बोधे (वय ३८, रा. कोरेगाव मूळ, बोधे-काकडेवस्ती, ता. हवेली) यांनी फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल जगन्नाथ पवार (रा. कोरेगाव मूळ गावठाण, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. २०) कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीची मासिक बैठक होती. ११ सदस्यांपैकी सरपंच प्रमोद बोधे, उपसरपंच जयसिंग केशव शितोळे व प्रफुल्ल जगन्नाथ पवार हे तिघेच हजर होते. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी एस. एम. गायकवाड यांनी गणसंख्येअभावी बैठक तहकूब करून ही सभा २७ मार्च रोजी घेण्याचे ठरविले. त्या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पवार याने ग्रामपंचायतीचा १५ टक्के मागसवर्गीय निधी कोठे खर्च केला, ही माहिती ग्रामविकास अधिकार्यांना विचारली. त्या वेळी सरपंच प्रमोद बोधे हे प्रफुल्ल पवार यांना म्हणाले, 'तुम्ही गेल्या सात मासिक बैठकांना गैरहजर होता. या वेळी ग्रामविकास अधिकारी एस. एम. गायकवाड यांनी अशी माहिती दिली, की भुजंगनगर व गावठाणातील गटार लाईनवर हा निधी सर्वानुमते खर्च करण्यात आला आहे. त्या वेळी प्रफुल्ल पवार हा हा निधी फक्त गावठाणातच वापरायचा, असे म्हणून सरपंचाना शिवीगाळ करीत लाकडी खर्ची उचलून मारण्यासाठी धावला. या वेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड व उपसरपंच शितोळे यांनी त्याला अडविले. शिपाई संपत बोरडे व क्लार्क शेखर गोरे यांनी ही भांडणे सोडवली. त्यानंतर सरपंच प्रमोद बोधे हे दाखले पाहत असताना प्रफुल्ल पवार याने टेबलावरील काचेचा फ्लॉवरपॉट उचलून सरपंचांच्या डोक्यात मारला. यात बोधे हे गंभीर जखमी झाल्याने खाली कोसळले. उपस्थित लोकांनी त्यांना प्रथम उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात व नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी पुढील तपास करीत आहेत.
(निनाद) सदस्याच्या मारहाणीत कोरेगाव मूळचे सरपंच जखमी
डोक्यात मारला फ्लॉवरपॉट : पुण्यात उपचार सुरू
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30
डोक्यात मारला फ्लॉवरपॉट : पुण्यात उपचार सुरू
