भर : अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल छात्रवृत्ती (परमवीर चक्र) पुरस्काराने गौरवण्यात आले. अनंतराव थोपटे महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात थोपटे महाविद्यालयाच्या माजी छात्रांनी स्थापन केलेल्या शिवगंगा प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, लफ्टनंट कमांडर आर. डी. जाधव, प्रतिष्ठानच्या सचिव सीमा कोंडे-जगताप, असिफ शेख, चैतन्य पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी एन. सी.सी.मधील योगदान व गुणवत्ता या आधारावर प्रिया अंत्रोली, पूजा गोळे, योगिता कुडले, अनिता दळवी, विशाल धनावले, भूषण समगीर, मोहन लिम्हण यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिवगंगा प्रतिष्ठानच्या सचिव सीमा कोंडे म्हणाल्या, की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये साहस, चारित्र्य व नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी यापुढेही अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन असिफ इकबाल शेख यांनी केले .
(निनाद) अरुण खेत्रपाल छात्रवृत्तीने सात विद्यार्थ्यांचा गौरव
भोर : अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल छात्रवृत्ती (परमवीर चक्र) पुरस्काराने गौरवण्यात आले.
By admin | Updated: February 8, 2015 23:40 IST2015-02-08T23:40:34+5:302015-02-08T23:40:34+5:30
भोर : अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल छात्रवृत्ती (परमवीर चक्र) पुरस्काराने गौरवण्यात आले.
