Lokmat Money > बिझनेस न्यूज > (निनाद) समर्थ महाविद्यालय संघ कबड्डीत तृतीय

(निनाद) समर्थ महाविद्यालय संघ कबड्डीत तृतीय

बेल्हा : येथील समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या कबड्डीसंघाने १९ वर्षे वयोगटात तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

बेल्हा : येथील समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या कबड्डीसंघाने १९ वर्षे वयोगटात तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

(Ninaad) Samarth College Sangh Kabaddi III | (निनाद) समर्थ महाविद्यालय संघ कबड्डीत तृतीय

(निनाद) समर्थ महाविद्यालय संघ कबड्डीत तृतीय

ल्हा : येथील समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या कबड्डीसंघाने १९ वर्षे वयोगटात तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा डुंबरवाडी येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुलांनी १९ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळविला. तसेच, जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक मिळविला, तर मुलांनी तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये ४ उत्कृष्ट खेळाडुंची विभागीय स्पर्धेतील निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. यामध्ये प्रफुल्ल बोर्‍हाडे, अजित दाते, पल्लवी गुंजाळ, श्रुती दरेकर यांची निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, संस्थेचे सचिव विवेक शेळके, संचालक वल्लभ शेळके, प्राचार्य राजीव सावंत, क्रीडाशिक्षक राहुल पातुरकर, संतोष पोटे, राजेंद्र नवले व सर्व शिक्षकांनी केले आहे.
फोटो ओळ : बेल्हा (ता.जुन्नर) येथील समर्थ विद्यालयातील कबड्डी स्पर्धेतील विजेते खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक .
---------

Web Title: (Ninaad) Samarth College Sangh Kabaddi III

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.