Lokmat Money > बिझनेस न्यूज > २० रुपयांची नवी नोट येणार

२० रुपयांची नवी नोट येणार

रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत २० रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. यावर इन्सेट लेटर ‘ई’चा उल्लेख असणार आहे.

By admin | Updated: July 18, 2014 01:58 IST2014-07-18T01:58:52+5:302014-07-18T01:58:52+5:30

रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत २० रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. यावर इन्सेट लेटर ‘ई’चा उल्लेख असणार आहे.

A new note of 20 rupees will come | २० रुपयांची नवी नोट येणार

२० रुपयांची नवी नोट येणार

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक लवकरच महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत २० रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. यावर इन्सेट लेटर ‘ई’चा उल्लेख असणार आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘मध्यवर्ती बँक लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात सादर करणार आहे.
रुपयाच्या चिन्हासह इन्सेटमध्ये इंग्रजी अक्षर ‘ई’ छापलेले असेल. महात्मा गांधी शृंखला- २००५ अंतर्गत छापण्यात येणाऱ्या या नोटेवर गव्हर्नर रघुराम जी. राजन यांची स्वाक्षरी असेल.’
प्रसिद्धीपत्रकानुसार, या नोटेचे प्रकाशन वर्ष २०१४ असून यापूर्वी या शृंखलेत जारी करण्यात आलेल्या नोटेप्रमाणेच याचे डिझाईन असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: A new note of 20 rupees will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.