Lokmat Money > बिझनेस न्यूज > न्यू इंडिया अ‍ॅशुरन्सला ४४१ कोटींचा करोत्तर नफा

न्यू इंडिया अ‍ॅशुरन्सला ४४१ कोटींचा करोत्तर नफा

विमा क्षेत्रात देशात अग्रेसर असलेल्या न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स प्रसिद्धीस दिलेल्या वित्तीय निकालानुसार जून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत कंपनीच्या नफ्यात वाढ होत

By admin | Updated: August 5, 2015 22:33 IST2015-08-05T22:33:15+5:302015-08-05T22:33:15+5:30

विमा क्षेत्रात देशात अग्रेसर असलेल्या न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स प्रसिद्धीस दिलेल्या वित्तीय निकालानुसार जून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत कंपनीच्या नफ्यात वाढ होत

New India Assurance raises Rs 441 crore post-tax profits | न्यू इंडिया अ‍ॅशुरन्सला ४४१ कोटींचा करोत्तर नफा

न्यू इंडिया अ‍ॅशुरन्सला ४४१ कोटींचा करोत्तर नफा

मुंबई : विमा क्षेत्रात देशात अग्रेसर असलेल्या न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स प्रसिद्धीस दिलेल्या वित्तीय निकालानुसार जून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत कंपनीच्या नफ्यात वाढ होत कंपनीला ४४१ कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे.
गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला ३११ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यातुलनेत यंदा नफ्याच्या टक्केवारीत ४२ टक्के वाढ झाली असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष वन् व्यवस्थापकीय संचालक जी.श्रीनिवासन यांनी दिली. या कालावधीत कंपनीला ५३५ कोटी रुपयांचा करपूर्व नफा झाला
आहे.
याच कालावधीत कंपनीच्या प्रीमीयम कलेक्शनमध्येही वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या ३३९८ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ ३८७७ कोटी रुपये इतकी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New India Assurance raises Rs 441 crore post-tax profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.