Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयबीजेएकडून नवा इतिहास- मोहित कंबोज

आयबीजेएकडून नवा इतिहास- मोहित कंबोज

भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच आयबीजेएच्या (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) रोजच्या क्लोजिंग किमती सोने रोखे जारी करण्यासाठी पायाभूत किमती म्हणून राखण्यात आल्या आहेत.

By admin | Updated: November 15, 2015 01:57 IST2015-11-15T01:57:18+5:302015-11-15T01:57:18+5:30

भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच आयबीजेएच्या (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) रोजच्या क्लोजिंग किमती सोने रोखे जारी करण्यासाठी पायाभूत किमती म्हणून राखण्यात आल्या आहेत.

New History from IBJA - Mohit Kamboj | आयबीजेएकडून नवा इतिहास- मोहित कंबोज

आयबीजेएकडून नवा इतिहास- मोहित कंबोज

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच आयबीजेएच्या (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) रोजच्या क्लोजिंग किमती सोने रोखे जारी करण्यासाठी पायाभूत किमती म्हणून राखण्यात आल्या आहेत. त्याबद्दल संघटनेकडून रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि वित्त मंत्रालयाचे आभार मानण्यात आले आहेत. दरम्यान, सोने रोखे जारी करून आयबीजेएकडून नवा इतिहास रचला गेल्याचे संघटनेचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
आयबीजेए ६७ वर्षांपासून ओपनिंग आणि क्लोजिंगच्या किमती जाहीर करत आहे. या किमती सीमा शुल्क, अबकारी, प्राप्तिकर या विभागाकडून स्वीकारण्यात येतात. बँकांना केवळ आयबीजेएने जाहीर केलेल्या किमतीवर आधारित राहून दागिन्यांवर कर्जे देण्यास परवानगी देण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित सोने रोखीकरण आणि सार्वभौम सोने रोखे योजना आता खुली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजना सुरू झाल्या आणि नाण्यांचे अनावरण ५ नोव्हेंबर रोजी झाले. आयबीजेएच्या शिष्टमंडळाने नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली आणि दागिन्यांच्या विभागात व्यवसाय करण्यातील सुधारणांबाबत चर्चा केली.
कंबोज म्हणाले की, आपल्या ६७ व्या स्थापना दिवसाचे आयोजन करत असलेली आयबीजेए इंडिया इंटरनॅशनल बुलियन समिट (आयआयबीएस) १ जानेवारी २०१६ रोजी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. अद्ययावत संशोधन आणि संधी याची माहिती सर्वांना दिली जाईल. भारत ही नाणी आणि दागिन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे ही बाब लक्षात घेऊन आम्ही जगभरातून जास्तीत जास्त लोकांना या परिषदेसाठी सहभागी करून घेणार आहोत. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच मान्यवर आणि १५०० प्रतिनिधी एकदिवसीय चर्चेत सहभागी होतील.

Web Title: New History from IBJA - Mohit Kamboj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.