नवी दिल्ली : अर्थमंत्रालयाने आयकर रिटर्न अर्थात आयटीआरसाठी तीन पानी नव्या अर्जाची अधिसूचना आज जारी केली आहे. यातून परदेश दौरे आणि वापरात नसलेल्या बँक खात्यांची माहिती देण्याची अनिवार्य वादग्रस्त अट मागे घेण्यात आली आहे.
मंत्रालयाने आयकर विवरण दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवून ३१ आॅगस्ट केली आहे. आयटीआर-२ आणि आयटीआर-२ ए केवळ तीन पानांचा असून अन्य माहिती परिशिष्टांमध्ये द्यावी लागेल.
मंत्रालयाने म्हटले की, करदात्यांना केवळ आपला पारपत्र अर्थात पासपोर्ट क्रमांक द्यावा लागणार आहे. परदेश दौरा आणि खर्च याबाबतची कोणतीही माहिती देण्याची गरज नाही. निष्क्रिय बँक खात्यांची माहिती देण्याची अनिवार्यताही मागे घेतली आहे. करदात्याला गेल्या आर्थिक वर्षातील आपल्या सक्रिय बचत खात्याचा क्रमांक आणि आयएफएससी कोड द्यावा लागेल.
इन्कम टॅक्सचा नवा सोपा फॉर्म अखेर जारी
अर्थमंत्रालयाने आयकर रिटर्न अर्थात आयटीआरसाठी तीन पानी नव्या अर्जाची अधिसूचना आज जारी केली आहे. यातून परदेश दौरे आणि वापरा
By admin | Updated: May 31, 2015 23:30 IST2015-05-31T23:30:16+5:302015-05-31T23:30:16+5:30
अर्थमंत्रालयाने आयकर रिटर्न अर्थात आयटीआरसाठी तीन पानी नव्या अर्जाची अधिसूचना आज जारी केली आहे. यातून परदेश दौरे आणि वापरा
