ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6- फेसबूक या सोशल नेटवर्किंग साइटवर असलेल्या "निअर बाय" या फीचरमुळे व्यक्तीचं लोकेशन किंवा ती व्यक्ती आपल्यापासून किती जवळ आहे हे समजतं. फेसबूकच्या या फीचरनंतर आता स्नॅपचॅट या फोटो शेअरिंग अॅप्लिकेशनने लोकेशन ट्रॅक करणार फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे तुमच्या लिस्टमधील व्यक्ती तुमचं रिअल टाइम लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे स्नॅपचॅट युझर्सना फोटो शेअर करत असताना दक्षता घ्यावी लागणार आहे.
लोकेशन ट्रॅक करण्यासाठी स्नॅप मॅप तुमचं लोकेशन, ट्रॅव्हल स्पीड आणि फोन युसेज ट्रॅक करून तुम्ही कुठे आहात, काय करता आहात ते शोधून काढतं. तसंच ही माहिती स्नॅपचॅटकडून एका इंटरॅक्टिव्ह मॅपवरून तुमच्या लिस्टमधील मित्रांसोबत शेअर करतं आहे. तसंच तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा सुरू केल्यावर तर तुम्ही काय करत आहात हेसुद्धा दिसू शकणार आहे.
तुमच्या मुलांना त्यांची लोकेशन शेअर करण्यापासून रोखा आणि सुरक्षित ठेवा, असं आवाहन फेसबुकवरील एका व्हिडिओत केलं जात आहे. तसंच स्नॅपचॅटच्या या नव्या फीचरला सोशल मीडियावर महिलांनी विरोध केला आहे. पण स्नॅपचॅट युझर्ससाठी एक दिलासादायक बाब स्नॅपचॅटने दिली आहे, तुमचं लोकेशन ट्रॅक करणारं हे फीचर युझर्सना बंद करून ठेवता येतं. अॅपमधील "घोस्ट मोड" अॅक्टीव्ह केल्यावर तुमचं लोकेशन लिस्टमधील मित्रांना दिसणार नाही. तसंच जरी तुमच्या फोनमध्ये असलेल्या स्नॅपचॅटच्या अॅपमधील "घोस्ट मोड" अॅक्टिव्ह असेल तरीही तुम्ही तुमच्या ज्या मित्रांचा घोस्ट मोड अॅक्टिव्ह नाही. अशांचं लोकेशन ट्रॅक करू शकता.
आणखी वाचा
रात्रीही काढा क्वालिटी फोटो, व्हॉट्सअॅपचं जबरदस्त फीचर
500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता
मोटो E4 प्लस स्मार्टफोन लवकरच भारतात !
स्नॅप मॅप म्हणजे काय ?
स्नॅपचॅट या फोटो शेअरिंग अॅपने 21 जून रोजी स्नॅप मॅप हे नवं फीचर लाँच केलं आहे. या फीचरच्या माध्यमातून अॅपवर शेअर केलेल्या फोटो आणि व्हीडीओबरोबरच तुमचं करंट लोकेशनही शेअर होतं. तुमच्या स्नॅप लिस्टमध्ये असलेले मित्र लोकेशन यामुळे पाहू शकतात. युझरने त्याचं लोकेशन शेअर केल्यानंतर ते कार्टून फॉर्ममध्ये स्नॅप मॅपवर दिसतं.