संतोष वानखडे, वाशिम
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याचा उपक्रम राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमांतर्गत गत पाच वर्षांत राज्यभरात ७९ लाख ८२ हजार ३९१ नवीन मीटर बसविण्यात आल्याची नोंद महावितरणच्या दप्तरी आहे.
वीजचोरी आणि हानीचा फटका महावितरणला सोसावा लागतो. मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा पुरेसा नसल्याने सर्वसामान्य ग्राहक घामाघूम होत आहे. वीज चोरी आणि हानीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपक्रम व मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणजे जुने मीटर बदलून नवीन मीटर ग्राहकांच्या घरावर लावणे, हा आहे. मीटरमध्ये कुणालाही ‘काड्या’ करता येणार नाहीत, याची दक्षता घेऊनच नवीन मीटर तयार करण्यात आले आहेत. सात-आठ वर्षांपासून असलेले जुने मीटर बदलून, नवीन मीटर बसविले जात आहेत.
गत पाच वर्षांत राज्यभरात ७९ लाख ८२ हजार ३९१ नवीन मीटर बसविले आहेत. २००९-१० या आर्थिक वर्षामध्ये १२ लाख ५७ हजार ३०८ जुने मीटर बदलून तेवढेच नवीन मीटर लावण्यात आले आहेत.
याप्रमाणेच २०१०-११ मध्ये १२ लाख पाच हजार ३६४, २०११-१२ मध्ये १२ लाख ९५ हजार ७७५, २०१२-१३ मध्ये २२ लाख ५७ हजार १८०, तर २०१३-१४ मध्ये १९ लाख ६६ हजार ७६४ नवीन मीटर बसविण्यात आले. वीज चोरीच्या दृष्टीने नवीन मीटरमध्ये कोणतीही हेराफेरी करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली
आहे.
८० लाख ग्राहकांना नवीन विद्युत मीटर
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याचा उपक्रम राज्यभरात सुरू आहे.
By admin | Updated: November 21, 2014 03:37 IST2014-11-21T03:34:22+5:302014-11-21T03:37:44+5:30
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याचा उपक्रम राज्यभरात सुरू आहे.
