संजय पाठक, काठमांडू
भूकंपामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडून पडला असला, तरी पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये पर्यटकांनी पुन्हा नेपाळमध्ये यावे, यासाठी नेपाळ टुरिझम बोर्डाने कंबर कसली असून, भारतभरातील पर्यटन कंपन्यांना निमंत्रित करण्यासह विविध योजना राबविण्यात येणार आहेत. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.
पर्यटन व्यवसाय ही नेपाळची आर्थिक नाडी आहे. नेपाळमध्ये गेल्या २५ एप्रिलला झालेल्या भूकंपामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. विशेषत: नेपाळमधील अनेक पुरातन वास्तू नष्ट झाल्याच्या अपप्रचारामुळे नेपाळकडे पर्यटक येण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेपाळ टुरिझम बोर्डाने आता पर्यटकांपर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे. त्याची माहिती देताना अधिकारी यांनी सांगितले की, नेपाळच्या पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे. वर्षभरात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक भारतातील असतात. त्यानंतर चीनमधील पर्यटकांचा क्र मांक लागतो. नेपाळमध्ये ४० टक्के पर्यटक हे हिमालय आणि अन्य ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी येतात, तर ६० टक्के पर्यटक देवदर्शन आणि अन्य निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येतात. भारतातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने पर्यटनासाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे टुरिस्ट कंपन्यांनाच नेपाळमध्ये आमंत्रित करून वस्तुस्थिती दाखवण्यात येणार आहे.
नाशिकमधील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या ‘तान’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून, प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकपाठोपाठ दिल्ली, मुंबई, चेन्नई अशा अन्य ठिकाणच्या व्यावसायिकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये असाच उपक्र म राबविण्यात येणार आहे, असे अधिकारी यांनी सांगितले.
बोर्डाने भारतात वाराणसी येथे जनसंपर्कासाठी कार्यालय सुरू केले असून, गरजेनुसार अन्यत्र संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. अधिकारी यांनी स्वत: अलीकडेच चीनचा दौरा केला. यावेळी प्रथमच हॉँगकॉँग येथे नेपाळच्या पर्यटनाचे मार्केटिंग करण्यात आले.
अनेक माध्यमांनी विशेषत: दूरचित्रवाहिन्यांनी नेपाळमधील ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू नष्ट झाल्याचे चित्र रंगविले. प्रत्यक्षात मात्र अपवाद म्हणून काही अंशीच वास्तू बाधित झाल्या आहेत. पशुपतीनाथ मंदिरासह अन्य मंदिरे व वास्तू अत्यंत सुस्थितीत आहेत. हीच माहिती जगातील पर्यटकांना सांगण्यात येणार आहे. नेपाळच्या पहिल्या सत्रातील पर्यटन संपले. आता किमान पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरपासून तरी पुन्हा पर्यटक यावेत, यासाठी बोर्ड प्रयत्न करणार, असे अधिकारी यांनी सांगितले.
पर्यटकांसाठी नेपाळ सप्टेंबरपासून सज्ज
भूकंपामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडून पडला असला, तरी पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये पर्यटकांनी पुन्हा नेपाळमध्ये यावे, यासाठी नेपाळ टुरिझम
By admin | Updated: June 22, 2015 23:37 IST2015-06-22T23:37:05+5:302015-06-22T23:37:05+5:30
भूकंपामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडून पडला असला, तरी पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये पर्यटकांनी पुन्हा नेपाळमध्ये यावे, यासाठी नेपाळ टुरिझम
