नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी पर्यटन क्षमता वाढविणे आणि पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी नव्या पर्यटन धोरणाची गरज व्यक्त केली.
दिल्ली नगरपालिका क्षेत्रात नऊ एकर जमिनीवरील पंडित दीनदयाल उपाध्याय नामक प्रस्तावित पर्यटन भवनाच्या कोनशिला कार्यक्रमात ते बोलत होते. जगातील अनेक देश केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटन क्षेत्राच्या भरवशावर या देशांचा आर्थिक डोलारा उभा आहे. भारतातही पर्यटन क्षेत्र विकासाला मोठा वाव आहे. दुर्दैवाने गत ६८ वर्षांत पर्यटनाला चालना देण्याऐवजी त्यांना नुकसान पोहोचविण्याचेच प्रयत्न झाले.
अधिकाधिक पर्यटकांना आकर्षिक करण्याची क्षमता व संधी असूनही त्या क्षमतांचा पुरेपूर वापर झाला नाही. म्हणूनच देशाला आता नव्या पर्यटन धोरणाची गरज आहे, असे जेटली यावेळी म्हणाले.(वृत्तसंस्था)
देशाला नव्या पर्यटन धोरणाची गरज- जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी पर्यटन क्षमता वाढविणे आणि पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी नव्या पर्यटन धोरणाची गरज व्यक्त केली.
By admin | Updated: September 28, 2015 01:51 IST2015-09-28T01:51:02+5:302015-09-28T01:51:02+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी पर्यटन क्षमता वाढविणे आणि पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी नव्या पर्यटन धोरणाची गरज व्यक्त केली.
