Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज’

‘अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज’

कृषी आणि औद्योगिक शाश्वत विकासासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करण्याची खरी गरज असून, शासनाने शेतकऱ्यांना कमी खर्चात

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST2015-03-09T23:48:30+5:302015-03-09T23:48:30+5:30

कृषी आणि औद्योगिक शाश्वत विकासासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करण्याची खरी गरज असून, शासनाने शेतकऱ्यांना कमी खर्चात

'The need of the hour is to use renewable energy' | ‘अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज’

‘अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज’

अकोला : कृषी आणि औद्योगिक शाश्वत विकासासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करण्याची खरी गरज असून, शासनाने शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलर पंप उपलब्ध करू न देण्यासाठी नवे धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात ९ मार्च रोजी ‘कृषी आणि औद्योगिक शाश्वत विकासासाठी नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची उपस्थिती होती.
विजय नवल पाटील म्हणाले की, भविष्यातील इंधन, विजेची गरज लक्षात घेऊन तत्कालीत प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर या देशात होण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते, तेव्हापासून या देशात अपारंपरिक ऊर्जेवर काम सुरू असून, आता ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात शेती, उद्योगात वापरण्याची गरज असूून, त्यादृष्टीने शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. जगातील काही देशात घरावर सोलर वॉटर वापरासंबंधी कायदा करण्यात आला आहे.
या पद्धतीने येथे या विषयावर काम करण्याची गरज आहे. या कृषी विद्यापीठाने अपारंपरिक ऊर्जा या विषयावर सुरू केलेले काम उत्तम असून, करंज या वनस्पतीपासून जैव इंधनाचा केलेला प्रयोग अधिक व्यापक करावा लागणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'The need of the hour is to use renewable energy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.