Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वभाव, सवयीवरून ठरणार कर्जाची पत

स्वभाव, सवयीवरून ठरणार कर्जाची पत

सातत्याने वाढणाऱ्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आणि आताच्या अनुभवावरून शहाणे होत भविष्यात कर्ज थकू नये, यासाठी बँका अधिक गांभीर्याने कामाला लागल्या असून याकरिता आता

By admin | Updated: March 10, 2016 03:10 IST2016-03-10T03:10:03+5:302016-03-10T03:10:03+5:30

सातत्याने वाढणाऱ्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आणि आताच्या अनुभवावरून शहाणे होत भविष्यात कर्ज थकू नये, यासाठी बँका अधिक गांभीर्याने कामाला लागल्या असून याकरिता आता

The nature, the credit of the loan will be decided | स्वभाव, सवयीवरून ठरणार कर्जाची पत

स्वभाव, सवयीवरून ठरणार कर्जाची पत

मनोज गडनीस,  मुंबई
सातत्याने वाढणाऱ्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आणि आताच्या अनुभवावरून शहाणे होत भविष्यात कर्ज थकू नये, यासाठी बँका अधिक गांभीर्याने कामाला लागल्या असून याकरिता आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या ‘बिग डेटा’ प्रणालीचा वापर करणार आहेत. थकीत कर्ज कमी करणे आणि थकीत कर्जाचे प्रमाण रोखणे यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका परिषदेत आता बँकांनी बिग डेटा प्रणालीचा अतंर्भाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या घडीला ग्राहकाच्या सवयी, आवडीनिवडी, स्वभावाचा पॅटर्न याकरिता मोठ्या प्रमाणावर ‘बिग डेटा’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. या तंत्रज्ञानाअंतर्गत ई-मेल, सोशल मीडिया आणि अशा विविध तंत्राविष्काराचा ग्राहकातर्फे होणारा वापर लक्षात घेऊन त्याच्या स्वभावाचे आणि सवयींचे विश्लेषण केले जाते. या सर्व माहितीची छाननी करून ती माहिती विविध क्षेत्रातील कंपन्यांना विकली जाते, व या कंपन्या त्या अनुषंगाने त्यांची उत्पादने आणि जाहीरातील ग्राहकासमोर मांडतात. याच तंत्राचा अवलंब करण्याचे आता बँकांनीही योजिले आहे.
सध्या बँकांच्या थकीत कर्जाने पावणे चार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या थकीत कर्जामुळे बँकांसमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. त्यामुळे थकलेल्या कर्जाची वसुली करताना नव्याने ज्या कर्जाचे वितरण होत आहे, ते देताना बँका आता अधिक सतर्क होत आहेत. ज्याला कर्ज द्यायचे आहे, त्याची बारकाईने माहिती मिळविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. आता त्याचाच भाग म्हणून या बिग डेटा तंत्राचा वापर होईल. या तंत्रामुळे बँकांना ग्राहकाच्या स्वभावाची आणि सवयींची माहिती होईल.

Web Title: The nature, the credit of the loan will be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.