नाशिक महत्त्वाचे- किकवी धरण-
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:27+5:302014-09-11T22:30:27+5:30

नाशिक महत्त्वाचे- किकवी धरण-
>किकवी धरणाची निविदान काढण्याचे कोर्टाचे आदेशऔरंगाबाद : नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणार्या किकवी धरणाची निविदा प्रक्रिया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी शासनास दिले.राज्य सरकारने २००४ साली जाहीर केलेल्या धोरणामध्ये जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सरकारने स्वत:च्याच धोरणाची पायमल्ली करीत केवळ २०१६ साली नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्याचे निमित्त करत किकवी धरण बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिली, असा आक्षेप विकास नामदेव लोळगे आणि बन्सीलाल यादव यांनी जनहित याचिकेद्वारे नोंदविला आहे. या धरणातून केवळ नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. २००४ पर्यंत जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात २२ धरणे बांधण्यात आली. त्यामुळे वरच्या धरणात ४० टीएमसी पाणी अडविले जाते. परिणामी, जायकवाडी धरण वेळेत भरत नाही. तसेच नांदूर मधमेश्वर प्रकल्पासाठी निधी दिला जात नाही. हा प्रकल्प निधीअभावी ३० वर्षांपासून रखडून ठेवून नाशिककरांसाठी धरण बांधले जात आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात न्यायालयाने २१ ऑगस्टला जलसंपदा विभागाच्या सचिवांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गंगापूर धरणाच्यावर किकवी धरण बांधले जात असल्याचे शासनाचे शपथपत्र मुख्य सरकारी वकील ॲड. संभाजी टोपे यांनी सादर केले. गंगापूर धरणात गाळ साचल्याने त्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. शिवाय या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नमूद केले. किकवी धरण बांधण्यासाठी शासनाच्या जलनियमन प्राधिकरणाची २००९ साली मान्यता घेण्यात आली. नांदूर मधमेश्वर धरण बांधकामाचा कोणताही निधी किकवी धरणासाठी वर्ग केला जाणार नसल्याचे शपथपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी शासनाने सादर केलेल्या शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागून घेतली. (प्रतिनिधी)