‘नर्मदा घाटी’ संवाद यात्रेचा समारोप
By admin | Updated: August 29, 2014 23:55 IST2014-08-29T23:55:44+5:302014-08-29T23:55:44+5:30

‘नर्मदा घाटी’ संवाद यात्रेचा समारोप
>मणिबेली : जनसंघटनांकडून पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह उपस्थितनंदुरबार : नर्मदा अधिकार संवाद यात्रेचा मणिबेली येथे विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. देशभरातील विविध जनसंघटनांच्या प्रतिनिधींनी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून धरत देशभर जागृती करण्याची ग्वाही दिली.गीतकार-संगीतकार स्वानंद किरकिरे यांच्यासह महान संघर्ष समिती, मध्य प्रदेशच्या प्रिया पिल्लई, नागपूरच्या दलित संघटनेचे बाबूलाल भाई व गिरीशभाई, तामिळनाडूतील कुडामकुलन संघर्षच्या आशा वंथ, छात्रभारतीचे प्रवीण दत्ता, दिल्लीतील आर्किटेक्ट मुशरफ व त्यांचे पथक, मुक्ता र्शीवास्तव, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनासंदर्भातील भूमिका मांडली. विस्थापितांवरील अन्याय जगासमोर मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली.मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधील विस्थापिकांचे पुनवर्सन अपूर्ण आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने काही निर्णय घेतले. हे अन्यायकारी असल्याचे सांगत आंदोलकांनी त्याचा निषेध केला. धरणाची उंची वाढवताना टप्प्या-टप्प्यावर शून्य प्रकल्पबाधित बाकी असल्याच्या राज्य शासनांनी केलेल्या खोट्या खेळाला महाराष्ट्रही अपवाद ठरले नाही हे दुर्दैव आहे, असे मेधा पाटकर यांनी सांगितले. विस्थापितांपैकी बामणी येथील धरमसिंग वसावे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)