Lokmat Money > बिझनेस न्यूज > माझे मत - फोर्सची मनमानी

माझे मत - फोर्सची मनमानी

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देत असलेल्या अनुदानाच्या मुद्दय़ावर ‘फोर्स’ या संघटनेने डायोसेसन सोसायटीच्या सहकार्याने गोव्यात ‘रास्ता रोको’ करून सगळ्य़ा जनतेला वेठीस धरले. कामानिमित्त बाहेर पडलेले, सरकारी व खाजगि आस्थापनात नोकरी करणारे, अँब्युलसमधून हॉस्पिटलमध्ये नेत असलेले रुग्ण वगैरे सगळ्य़ ालोकांची बरीच हाल अपेष्टा झाली. डायोसेसनच्या पदाधिकार्‍यानी तमाम पालकाना आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मिळत असलेले अनुदान बंद होणार असून सर्वांना फी भरावि लागणार अशी भिती दाखवून विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरवलं. बहुतेकाना तर आपण कशासाठी रास्तारोको करतो तेही ठाऊक नव्हतं.

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देत असलेल्या अनुदानाच्या मुद्दय़ावर ‘फोर्स’ या संघटनेने डायोसेसन सोसायटीच्या सहकार्याने गोव्यात ‘रास्ता रोको’ करून सगळ्य़ा जनतेला वेठीस धरले. कामानिमित्त बाहेर पडलेले, सरकारी व खाजगि आस्थापनात नोकरी करणारे, अँब्युलसमधून हॉस्पिटलमध्ये नेत असलेले रुग्ण वगैरे सगळ्य़ ालोकांची बरीच हाल अपेष्टा झाली. डायोसेसनच्या पदाधिकार्‍यानी तमाम पालकाना आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मिळत असलेले अनुदान बंद होणार असून सर्वांना फी भरावि लागणार अशी भिती दाखवून विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरवलं. बहुतेकाना तर आपण कशासाठी रास्तारोको करतो तेही ठाऊक नव्हतं.

My opinion - Force arbitrator | माझे मत - फोर्सची मनमानी

माझे मत - फोर्सची मनमानी

ग्रजी माध्यमाच्या शाळांना देत असलेल्या अनुदानाच्या मुद्दय़ावर ‘फोर्स’ या संघटनेने डायोसेसन सोसायटीच्या सहकार्याने गोव्यात ‘रास्ता रोको’ करून सगळ्य़ा जनतेला वेठीस धरले. कामानिमित्त बाहेर पडलेले, सरकारी व खाजगि आस्थापनात नोकरी करणारे, अँब्युलसमधून हॉस्पिटलमध्ये नेत असलेले रुग्ण वगैरे सगळ्य़ ालोकांची बरीच हाल अपेष्टा झाली. डायोसेसनच्या पदाधिकार्‍यानी तमाम पालकाना आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मिळत असलेले अनुदान बंद होणार असून सर्वांना फी भरावि लागणार अशी भिती दाखवून विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरवलं. बहुतेकाना तर आपण कशासाठी रास्तारोको करतो तेही ठाऊक नव्हतं.
जे काही घडलं ते पाहता आम्ही गोमंतकीय असेच निद्रिस्त राहिलो तर भविष्यात काश्मिर सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
ख्रिश्चन समाजामधल्या काही धर्मांध शक्ती ब्लॅकमेलिंग करुन आपलं इप्सित पद्धतशिररित्या साध्य करुन घेण्यास आजपर्यंत यशस्वि ठरलेल्या आहेत. हा भस्मासूर कोंकणीभक्तांमधल्या काही म्हालगड्यानी मराठी सर्मथकाना धडा शिकवण्यासाठी म्हणून जन्मास घातला होता. आज इंग्रजीसाठी जे आंदोलन करीत आहेत त्याच लोकांनी कोकणीसाठी असंच हिंसक आंदोलन करुन जनतेला वेठीस धरलं होतं. आता त्या लोकाना कोंकणी नको इंग्रजीच पाहिजे. ज्या लोकानी ह्या गुंडगिरीचे त्यावेळी सर्मथन केलं होतं त्याचं दिगंबर कामत सरकारन ज्या प्रकारे हा माध्यम प्रश्न हाताळला त्या वेळी थोबाडीत मारल्यासारकी गत झाली. असंगाशि केलेला संग महागात पडल्याच कळून आलं पण वेळ निघून गेील होती.
दिगंबराच्या कृपेने तमाम डायोसेसन सोसायटीच्या तथाकथित ‘कोंकणी’शाळा ह्या एका रा6ीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा बनल्या. नंतरचा इतिहास म्हणजे ‘भारतीय भाषा सुरक्षा मंचाची’ स्थापना होणे त्यांनी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्मथन देणे, भारतिय जनता पक्षाचे गोव्यातले दिग्गज नेते भा.भा.सु.मंचच्या व्यासपिठावरुन मोठमोठाली आश्वासनं देऊ लागले. गोव्यातील मंदिरामधून देवापुढं गार्‍हाणी घातली जाऊ लागली. नविडणुकांचा निकाल काँग्रेसच्या विरुद्ध गेला. भाजपाचं सरकार सत्तेवर आलं.
नमनालाच कुजका नारळ म्हणतात तास मनोहर र्पीकरांच्या नेतृत्त्वाखालील सरकारातील मंत्र्यांचा शपथविधी सोहला चालू असताना तिथं काही पाद्र्यांची असेलेली उपस्थिती, त्यांची व्यासपिठापाशि चालेली लगबग ही सुजाण लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणारीच होती. काँग्रेस किंवा पुर्विच्या युनायटेड गोअन्स प7ाच्या सरकारच्या शपथविधिच्या वेळी असं काही चालू असतं तर आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हत. ह्या उपस्थितिचं इंगित लवकरच लोकांच्या समोर आले, र्पीकर सरकारनं मुक्त हस्तानं म्हणतात तसं डायोसेसन सोसायटीला भरघोस मदत केली. दिगंबर कामत सरकार पेक्षा आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण सुरु झालं. भांभावलेल्या भा.भा.सुमंचच्या पदाधिकार्‍यांना काही पद बहाल केल्यावर त्यांची तोंड बंद झाली. माध्यमाच्या प्रश्नावर ज्या लोकांनी भाजपाला मदतान केलं होत त्याना विश्वासघात झाल्याचं कळून आले. सत्तेसाठी हेही काँग्रेससारखेच भ्रष्टाचारी, अनाचारी, रुन्हेगारी वृत्तिच्या लोकाना जवळ करण्यात पटाईत आहेत हे दिसून आलं. ज्या प्रकारे फोर्स ही संघटना आणि डायोसेसन सोसायटी कायदे नियम धाब्यावर बसवण्याचं धाडस करते, आव्हान देते त्यावरुन भाजपाच्या नेतृत्त्वाने ह्या लोकाना काय काय आश्वासन आणि वचनं या आधि देऊन ठेवलेली आहेत ते समज नाही, पण पाणी कुठं तरी मुरतं आहे. सरकारला सरळ आव्हान देण्या इतरपत धैर्य त्यांच्यात आलेलं आहे. गोव्याच्या ह्या दुर्दशेला कुणी डिसोझा, फालेरो हे कारणीभूत नाहीत. सत्तेसाठी, खर्चिसाठी काहीही करण्यास तयार असलेले प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, मनोहर र्पीकर हे जबाबदार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री अता कुठलं पाऊल उचलतात ते पहावं लागेल.
अनिल आचार्य, पर्तगाळ-काणकोण

Web Title: My opinion - Force arbitrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.