सलापूर- मुस्लीम देशांतील अंतर्गत युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात निदर्शने होत आहेत. अनेक भारतीय तरूण तेथील मुस्लिमांच्या एका गटाच्या बाजूने या युद्धात उतरत आहेत. हे भारताच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मर्शी मुझफ्फर हुसेन यांनी केल़े विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या वतीने आयोजित केलेल्या अरब - इस्राईल संघर्ष और भारत या व्याख्यानात ते बोलत होत़े अरब - इस्राईल संघर्षाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मुस्लीम, ख्रिश्चन व यहुदी हे तीनही धर्म राजकीय आहेत. यातच या संघर्षाचे मूळ दडले आहे. मात्र हिंदू, पारसी, बौद्ध, जैन, शीख हे धर्म आध्यात्मिक असल्याचे सांगून हुसेन म्हणाले, मध्य आशियातील गोंधळाचे बीज खिलायतीत आहे. अरब राष्ट्रांमध्ये झालेल्या खिलायतच्या पुनरूज्जीवनानंतर भारतातही त्याची मागणी मूळ धरू लागली आहे. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या खिलायत चळवळीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली, हा इतिहास भारतीयांनी विसरून चालणार नाही.आगामी काळात होणारे संभाव्य तिसरे महायुद्ध मध्य आशियातच लढले जाईल. यातून सिरीया, इराण, इराकसह अनेक देश प्रभावित होऊ शकतात. इस्लामी राष्ट्रातील शिया आणि सुन्नीमध्ये भांडणे लावण्याचे काम अमेरिका करीत आहे. अरब राष्ट्रांना मिळालेले पेट्रोल हे एक वरदान असले तरी त्यावरून होणारे राजकारण अयोग्य आहे. तिसरे महायुद्ध झाले तर यात इस्राईलची भूमिका महत्त्वाची ठरेल. या युद्धात जगाचे मोठे नुकसान होईल. हमासचे नेते स्वत:ला कितीही शक्तिशाली मानत असले तरी त्यांच्या विरोधकांना अमेरिकेची साथ आहे. त्यामुळे त्यांचा निभाव लागणार नाही. तसेच अरबी हे जिद्दी आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी ते विजयासाठी तेलविहिरींना आगी लावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर जगासमोर इंधनाचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असे ते म्हणाल़े
मुझफ्फर हुसेन व्याख्यान मुस्लिमांचा इस्लामी राष्ट्रांकडील कल चिंताजनक- हुसेन
सोलापूर-
By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:32+5:302014-08-22T23:32:32+5:30
सोलापूर-
