नवी दिल्ली : छोट्या शहरांतील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होत आहेत. यंदा मार्च अखेरपर्यंत छोट्या शहरांतील म्युच्युअल फंड संपत्तीचा आधार ३६ टक्क्यांनी वाढून १.८९ लाख कोटी झाला आहे.
असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंडस् आॅफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या शहरांतील म्युच्युअल फंडाची व्यवस्थापन अधीन संपत्ती मार्च २0१४ मध्ये १.३९ लाख कोटी रुपये होती. यंदाच्या मार्चमध्ये ती आता १.८९ लाख कोटी झाली आहे. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते छोट्या शहरांतील म्युच्युअल फंडांच्या वाढीचे कारण वितरकांना दिले जाणारे वाढीव पारितोषिक हे आहे. म्युच्युअल फंडांकडून राबविण्यात येणाऱ्या गुंतवणूकदार जागरूकता आणि शिक्षण कार्यक्रम, तसेच सेबीने सुरू केलेल्या प्रोत्साहन योजनांचाही सुयोग्य परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळेही काही प्रमाणात वाढ झाली आहे. भारतात ४४ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. त्या १२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
छोट्या शहरांमध्ये म्युच्युअल फंडांचे योगदान वाढले
छोट्या शहरांतील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होत आहेत. यंदा मार्च अखेरपर्यंत छोट्या शहरांतील म्युच्युअल फंड संपत्तीचा आधार ३६ टक्क्यांनी वाढून १.८९ लाख कोटी झाला आहे.
By admin | Updated: May 4, 2015 00:46 IST2015-05-04T00:46:08+5:302015-05-04T00:46:08+5:30
छोट्या शहरांतील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होत आहेत. यंदा मार्च अखेरपर्यंत छोट्या शहरांतील म्युच्युअल फंड संपत्तीचा आधार ३६ टक्क्यांनी वाढून १.८९ लाख कोटी झाला आहे.
