Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबी आणणार म्युन्सिपल बाँड

सेबी आणणार म्युन्सिपल बाँड

भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था असलेली सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) म्युन्सिपल बाँडस् जारी करण्याची नवी योजना आखत आहे

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST2014-09-12T00:07:37+5:302014-09-12T00:07:37+5:30

भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था असलेली सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) म्युन्सिपल बाँडस् जारी करण्याची नवी योजना आखत आहे

Municipal bonds to bring SEBI | सेबी आणणार म्युन्सिपल बाँड

सेबी आणणार म्युन्सिपल बाँड

मुंबई : भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था असलेली सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) म्युन्सिपल बाँडस् जारी करण्याची नवी योजना आखत आहे. सेबीकडून याबाबत तयारी सुरू असून, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अर्थमंत्रालयाशी सेबीची चर्चा सुरू असून, या बाँडची किंमत ठरविण्याबाबत असलेले नियम काही प्रमाणात शिथिल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जर ही बाँड खरेदी करमुक्त श्रेणीखाली असेल, तर बाँडच्या दराबाबत असलेली मर्यादा न ठेवण्याची सेबीची मागणी आहे. सध्या करमुक्त बाँड सरकारी बाँडपेक्षा अगदी कमी फरकाच्या दराने विक्रीस काढतात. मात्र, सध्याच्या व्याजदरवाढीच्या या काळात अशा तऱ्हेचे बंधन ठेवल्यास बाँड जारी करणाऱ्यांसाठी तो मोठा अडथळा ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal bonds to bring SEBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.