मुंबई : शेअर बाजारांनी शुक्रवारी अल्प का होईना; पण तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६ अंकांनी वाढून २८,१२१.८९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.६५ अंकांनी वाढून ८,५१३.८0 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारात कमजोरीचा कल असतानाही भारतीय बाजारांनी तेजी दर्शविली आहे. डिसेंबरमध्ये देशाची व्यापारी तूट १0 महिन्यांच्या नीचांकावर गेली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात अचानक कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारात तेजी आली आहे. काल विदेशी संस्थांनी १,७३८.२४ कोटी रुपयांची घसघशीत समभाग खरेदी केली.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला. लगेचच तो २00 अंकांनी उसळी घेऊन वर चढला. तथापि, नंतर बँकिंग आणि आयटी क्षेत्रात विक्रीचा जोर वाढल्याने तो खाली आला. सत्र अखेरीस ४६.३४ अंकांनी वाढ नोंदवून तो २८,१२१.८९ अंकांवर बंद झाला. आजची वाढ 0.१७ टक्के इतकी होती. काल सेन्सेक्स ७२८.७३ अंकांनी अथवा २.६६ टक्क्यांनी वाढला होता. या आठवड्यात सेन्सेक्सने ६६३ अंकांनी वाढ मिळविली आहे. ३१ आॅक्टोबर २0१४ नंतरची ही सर्वोत्तम साप्ताहिक वाढ ठरली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.६५ अंक अथवा 0.२३ टक्के वाढून ८,५१३.८0 अंकांवर बंद झाला. निफ्टी पुन्हा एकदा ८,५00 अंकांच्या वर चढला आहे.
आशियाई बाजारात मंदीचे वारे वाहताना दिसले. सिंगापूर, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया, जपान येथील समभाग 0.२९ टक्के ते १.४३ टक्के घसरले. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र १.२0 टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारातही मंदीचीच चाल दिसून आली. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0७ टक्के ते 0.४३ टक्के घसरले. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५४५ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३७६ कंपन्यांचे समभाग वर चढले. १0६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ४,१३५.५६ कोटी राहिली. काल ती ४,३0५.५५ कोटी होती.
मुंबई शेअर बाजार ४६ अंकांनी वाढला
शेअर बाजारांनी शुक्रवारी अल्प का होईना; पण तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६ अंकांनी वाढून २८,१२१.८९ अंकांवर बंद झाला
By admin | Updated: January 17, 2015 01:15 IST2015-01-17T01:15:00+5:302015-01-17T01:15:00+5:30
शेअर बाजारांनी शुक्रवारी अल्प का होईना; पण तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६ अंकांनी वाढून २८,१२१.८९ अंकांवर बंद झाला
