मुंबई : राजधानी दिल्लीत चटई क्षेत्रच्या प्रमाणात वाढ करण्यात आल्यामुळे रिअल्टी क्षेत्रतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 48 अंकांच्या सुधारणोसह 28,386.19 अंकांवर बंद झाला.
इतरही काही घटकांचा शेअर बाजाराच्या धारणोवर परिणाम झाला. पुढील महिन्यात रिझव्र्ह बँकेचा पतधोरण आढावा आहे. त्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय महिना अखेरीस डेरिव्हेटिव्ह सौद्यांचा निपटारा सुरू आहे. दिल्लीतील चटई क्षेत्रच्या प्रमाणात वाढ केल्याचे वृत्त येताच रिअल्टी क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांची मागणी वाढली. 750 ते 1000 चौरस मीटर क्षेत्रच्या भूखंडासाठी चटई क्षेत्रचे प्रमाण 150 वरून 200 टक्के करण्यात आले आहे. 1000 चौरस मीटरच्या भूखंडासाठी ते 120 टक्क्यांवरून 200 टक्के करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा रिअल्टी क्षेत्रचा निर्देशांक टॉप गेनर ठरला. तब्बल 4.03 टक्क्यांची वाढ त्याने नोंदवली. अनंत राज, डीएलएफ आणि युनिटेक या कंपन्यांचे शेअर्स 4 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान वाढले. याशिवाय ऊर्जा, धातू आणि एफसीजी या क्षेत्रतील कंपन्यांनीही गुंतवणूकदारांना आकर्षित केले. आयटीसीचा शेअर 2 टक्क्यांनी वाढला. काल तो 5 टक्क्यांनी कोसळला होता. एचडीएफसी, सेसा स्टरलाईट, एमअँडएम, गेल, भेल, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को यांचे शेअर्स तेजीत होते. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स मात्र घसरले.
एनएसईचा सीएनएक्स निफ्टी 12.65 अंकांनी अथवा 0.15 टक्क्यांनी वाढून 8,475.75 अंकांवर बंद झाला. दुस:या दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्सला आज पुन्हा मागणी आली. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपन्यांकडे मोर्चा वळवला. बीएसई मीडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.62 टक्क्यांनी आणि 1.12 टक्क्यांनी वाढले. (प्रतिनिधी)
च्बाजाराची एकूण व्याप सकारात्मक राहिला. 1,661 कंपन्यांचे समभाग तेजीत होते. 1,239 कंपन्यांचे समभाग घसरले. 124 कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिले.
च्बाजाराची एकूण उलाढाल 2,973.91 कोटी रुपये राहिली. काल ती 7,291.24 कोटी होती.
च्सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
च्उरलेल्या 14 कंपन्यांच्या समभागांना आपटी सहन करावी लागली.