Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजार पोहोचला ३ आठवड्यांच्या उच्चांकावर

मुंबई शेअर बाजार पोहोचला ३ आठवड्यांच्या उच्चांकावर

सलग चौथ्या सत्रातील तेजीने बुधवारी शेअर बाजारांनी तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९१.१६ अंकांनी वाढून २८,७0७.७५ अंकांवर बंद झाला

By admin | Updated: April 9, 2015 01:03 IST2015-04-09T00:08:42+5:302015-04-09T01:03:07+5:30

सलग चौथ्या सत्रातील तेजीने बुधवारी शेअर बाजारांनी तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९१.१६ अंकांनी वाढून २८,७0७.७५ अंकांवर बंद झाला

Mumbai Stock Exchange reaches three-week high | मुंबई शेअर बाजार पोहोचला ३ आठवड्यांच्या उच्चांकावर

मुंबई शेअर बाजार पोहोचला ३ आठवड्यांच्या उच्चांकावर

मुंबई : सलग चौथ्या सत्रातील तेजीने बुधवारी शेअर बाजारांनी तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९१.१६ अंकांनी वाढून २८,७0७.७५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५४.१0 अंकांच्या वाढीसह ८,७१४.१0 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि कोल इंडिया या कंपन्यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या निधीचा प्रवाह मजबूत राहिल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४ दिवसांत सेन्सेक्सने ७५0.२६ अंकांची उसळली घेतली आहे.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह २८,६0१.४९ अंकांवर उघडला होता. त्यांनतर तो आणखी वर चढून २८,७६३.0६ अंकांपर्यंत गेला. अस्थिर वातावरणात तो खालीही जाताना दिसला. एका क्षणी तो २८,५६६.६१ अंकांपर्यंत घसरला होता. सत्रअखेरीस तो २८,७0७.७५ अंकांवर बंद झाला. १९१.१६ अंकांची अथवा 0.६७ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. १७ मार्च रोजी सेन्सेक्स २८,७३६.३८ अंकांवर होता. त्यानंतरची सर्वोच्च पातळी त्याने बुधवारी गाठली.
५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ५४.१0 अंक अथवा 0.६२ टक्क्यांनी वर चढला. तीन आठवड्यांच्या उच्चांकासह तो ८,७१४.१0 अंकांवर बंद झाला. १७ मार्च रोजी तो ८,७२३.३0 अंकांवर बंद झाला
होता.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. ९ कंपन्यांचे समभाग घसरले. कोल इंडियाने ५.७३ टक्क्यांनी वाढ नोंदवून सेन्सेक्समध्ये सर्वोच्च वाढीचे स्थान पटकावले. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय एअरटेल, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब, गेल इंडिया, इन्फोसिस, आयटीसी आणि सिप्ला यांचा क्रमांक लागला. या उलट एचडीएफसी, एसएसएलटी, ओएनजीसी आणि हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग घसरले.
स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक १.७९ टक्के आणि 0.६५ टक्के वाढले. बाजाराची एकूण व्याप्ती वाढ दर्शवीत होती. १,८0३ कंपन्यांचे समभाग वाढले. ९९२ कंपन्यांचे समभाग घसरले. १२१ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,६३१.६२ कोटी झाली. आदल्या सत्रात ती ३,३0३.८८ कोटी होती.

Web Title: Mumbai Stock Exchange reaches three-week high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.