Lokmat Money > बिझनेस न्यूज > सहा हजार श्रीमंत शेतकऱ्यांकडे तब्बल ९० हजार हेक्टर जमीन

सहा हजार श्रीमंत शेतकऱ्यांकडे तब्बल ९० हजार हेक्टर जमीन

जिल्ह्यातील श्रीमंत शेतकऱ्यांच्या संख्या वाढू लागली आहे़ शासनाकडून प्रसिध्द झालेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल पाहिल्यास ही आकडेवारी अधिक स्पष्ट होते़

By admin | Updated: May 10, 2015 22:35 IST2015-05-10T22:35:28+5:302015-05-10T22:35:28+5:30

जिल्ह्यातील श्रीमंत शेतकऱ्यांच्या संख्या वाढू लागली आहे़ शासनाकडून प्रसिध्द झालेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल पाहिल्यास ही आकडेवारी अधिक स्पष्ट होते़

More than 90 thousand hectares of land for six thousand rich farmers | सहा हजार श्रीमंत शेतकऱ्यांकडे तब्बल ९० हजार हेक्टर जमीन

सहा हजार श्रीमंत शेतकऱ्यांकडे तब्बल ९० हजार हेक्टर जमीन

शिवाजी सुरवसे, सोलापूर
जिल्ह्यातील श्रीमंत शेतकऱ्यांच्या संख्या वाढू लागली आहे़ शासनाकडून प्रसिध्द झालेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल पाहिल्यास ही आकडेवारी अधिक स्पष्ट होते़ एकूण १२़६८ लाख हेक्टर क्षेत्र हे जमीनीचे आहे तर शेतकऱ्यांची संख्या ६़६८ लाख आहे़ ६ हजार ९७ ‘लक्ष्मीपूत्र’ शेतकऱ्यांकडे तब्बल ९० हजार १०३ हेक्टर शेती आहे़ तब्बल साडेचार लाख लहान शेतकऱ्यांकडे अवघी ४़३५ लाख हेक्टर जमीन आहे़ यातूनच ‘बांधावरचे शेतकरी’ आणि शेतात प्रत्यक्ष काम करणारे ‘कसणारे शेतकरी’ यांच्यातील दरी लक्षात येते़
राज्याच्या नियोजन विभाग व अर्थ व सांख्यिकी संचलनालयाच्या वतीने जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०१३ चा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला आहे़ सन २०११ च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १७ हजार असून एकूण काम करणाऱ्यांपैकी ३३ टक्के शेतकरी आणि ३० टक्के शेतमजूर असल्याचे नमूद केले आहे़ कमी लोकांकडे जास्त शेती आणि जास्त गरीब शेतकऱ्यांकडे कमी जमीन असे चित्र अहवालातून दिसते़ जिल्ह्णात १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या लहान शेतकऱ्यांची संख्या ही ४ लाख ४९ हजार ६४९ (६७ टक्के)आहे़ त्यांच्याकडे १२ लाख ६० हजार हेक्टर जमीनीपैकी ४ लाख ४९ हजार ६४९ हेक्टर जमीन आहे़ म्हणजेच त्यांच्याकडे सरासरी १ हेक्टर एवढीच जमीन आह़े मध्यम शेतकरी म्हणजेच २ ते १० हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची २ लाख १२ हजार १६४ एवढी संख्या असून त्यांच्याकडे एकूण जमीनीच्या ७ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र म्हणजेच ३२ टक्के क्षेत्र आहे़ तर श्रीमंत गणले जाणारे शेतकरी ज्यांची जमीन १० हेक्टरापेक्षा जास्त आहे अशांची संख्या ६०९७ आहे़ त्यांच्याकडे ९० हजार १०३ हेक्टर जमीन आहे़
-------
२००२-०३ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रांपैकी २़१४ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे तर ८़१५ हेक्टर क्षेत्र शेतीला उपलब्ध नसलेले क्षेत्र आहे़ २२ हेक्टर क्षेत्र हे लागवड न केलेले आहे़ ऊस आणि नगदीपिकाखालील शेत्र हे ६१ हजार ३११ हेक्टर आहे तर ४ लाख ३९ हजार २७१ क्षेत्र हे तृणधान्याखाली आहे़

Web Title: More than 90 thousand hectares of land for six thousand rich farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.