नवी दिल्ली : हँडसेटच्या किमतीतील घट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी २५ टक्क्यांची सरासरी वाढ होईल. यामुळे २०१७-१८ पर्यंत ही संख्या वाढून ५१.९ कोटींवर जाईल, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
भारताच्या दूरसंचार क्षेत्राविषयी मॉर्गन स्टॅनलीने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, मोबाईल हँडसेटवरील खर्चात घट आणि स्मार्टफोनचा झपाट्याने होत असलेला प्रसार, जलद बँडविड्थ आणि चांगली आॅनलाईन सेवा यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल. २०१५-१६ पर्यंत ही संख्या वाढून ३३ कोटींवर जाईल.
सध्या भारतात २१ कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. यात २०१८ पर्यंत प्रतिवर्षी सरासरी २५ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या ५१.९ कोटी रुपये होईल. इंटरनेटचा वापर वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून ७५० एमबी प्रतिवापरकर्ता एवढा होईल, असे या अहवालात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांत देशात स्मार्टफोनची किंमत २०० डॉलरने कमी होऊन ५० डॉलरवर आली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
दूरसंचार नियामक संस्था ट्रायच्या मते, सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंत देशात एकूण २१ कोटी इंटरनेट वापरकर्ते होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२०१८ पर्यंत ५० कोटींहून अधिक नेट ग्राहक होणार
हँडसेटच्या किमतीतील घट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी २५ टक्क्यांची सरासरी वाढ होईल
By admin | Updated: June 16, 2014 04:14 IST2014-06-16T04:14:11+5:302014-06-16T04:14:11+5:30
हँडसेटच्या किमतीतील घट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी २५ टक्क्यांची सरासरी वाढ होईल
