Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनी पानासाठी - शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग सुवर्णखरेदी : सराफी पेढ्यांचा मात्र पुनर्वसूतच आग्रह

मनी पानासाठी - शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग सुवर्णखरेदी : सराफी पेढ्यांचा मात्र पुनर्वसूतच आग्रह

नाशिक : गुरुपुष्यामृतावर सुवर्णखरेदी हा एक पायंडाच गेल्या काही वर्षांपासून रुजला आहे आणि तो रुजविण्यात सराफी व्यावसायिकांचे मोठे योगदान राहिले आहे. आता पितृपक्षात सर्वत्र उलाढाल मंदावली असताना, गुरुवार, दि. १८ रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याचे सांगत सराफी व्यावसायिकांकडून सुवर्णखरेदीचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत. परंतु वास्तवात गुरुपुष्यामृतयोग शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून ते सूयार्ेदयापर्यंत सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत असल्याने सराफी व्यावसायिक या कालावधीत आपल्या पेढ्या खुल्या ठेवणार आहेत काय, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही सराफी पेढ्या मात्र गुरुवारीसच दिवसभर गुरुपुष्यामृतयोग असल्याचे सांगत पुनर्वसू नक्षत्रातच सुवर्णखरेदीचा घाट घालताना दिसून येत आहेत.

By admin | Updated: September 18, 2014 00:03 IST2014-09-17T22:19:12+5:302014-09-18T00:03:10+5:30

नाशिक : गुरुपुष्यामृतावर सुवर्णखरेदी हा एक पायंडाच गेल्या काही वर्षांपासून रुजला आहे आणि तो रुजविण्यात सराफी व्यावसायिकांचे मोठे योगदान राहिले आहे. आता पितृपक्षात सर्वत्र उलाढाल मंदावली असताना, गुरुवार, दि. १८ रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याचे सांगत सराफी व्यावसायिकांकडून सुवर्णखरेदीचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत. परंतु वास्तवात गुरुपुष्यामृतयोग शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून ते सूयार्ेदयापर्यंत सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत असल्याने सराफी व्यावसायिक या कालावधीत आपल्या पेढ्या खुल्या ठेवणार आहेत काय, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही सराफी पेढ्या मात्र गुरुवारीसच दिवसभर गुरुपुष्यामृतयोग असल्याचे सांगत पुनर्वसू नक्षत्रातच सुवर्णखरेदीचा घाट घालताना दिसून येत आहेत.

For Money Page - Gurupushamrit Yog Suvarn Khedi on Friday morning: Only rehabilitation of Sarafi stairs | मनी पानासाठी - शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग सुवर्णखरेदी : सराफी पेढ्यांचा मात्र पुनर्वसूतच आग्रह

मनी पानासाठी - शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग सुवर्णखरेदी : सराफी पेढ्यांचा मात्र पुनर्वसूतच आग्रह

नाशिक : गुरुपुष्यामृतावर सुवर्णखरेदी हा एक पायंडाच गेल्या काही वर्षांपासून रुजला आहे आणि तो रुजविण्यात सराफी व्यावसायिकांचे मोठे योगदान राहिले आहे. आता पितृपक्षात सर्वत्र उलाढाल मंदावली असताना, गुरुवार, दि. १८ रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याचे सांगत सराफी व्यावसायिकांकडून सुवर्णखरेदीचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत. परंतु वास्तवात गुरुपुष्यामृतयोग शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून ते सूयार्ेदयापर्यंत सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत असल्याने सराफी व्यावसायिक या कालावधीत आपल्या पेढ्या खुल्या ठेवणार आहेत काय, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही सराफी पेढ्या मात्र गुरुवारीसच दिवसभर गुरुपुष्यामृतयोग असल्याचे सांगत पुनर्वसू नक्षत्रातच सुवर्णखरेदीचा घाट घालताना दिसून येत आहेत.
गुरुपुष्यामृतयोग हा सुवर्णखरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर होणारी उलाढाल लक्षात घेता सराफी पेढ्याही व्यवसाय संधी साधत सज्ज झालेल्या असतात. आता पितृपंधरवड्यातही गुरुपुष्यामृतयोग असला, तरी तो शुक्रवारी (दि. १९) पहाटेपासून अवघ्या तीन तासांसाठी आहे. मात्र, गुरुवारी (दि. १८) दिवसभर गुरुपुष्यामृतयोग असल्याचे सांगत सुवर्ण खरेदीची संधी साधणारे मेसेज सराफी पेढ्यांकडून सोशल मीडियावर फिरत आहेत. वस्तुत: गुरुपुष्यामृतयोग गुरुवारी उत्तररात्री ३ वाजून २४ मिनिटांपासून सुरू होत असून, पहाटे सूयार्ेदयापर्यंत म्हणजे ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत आहे. बुधवारी रात्रीच १२ वाजून ४२ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला असून, शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहणार आहे. म्हणजेच गुरुवारी दिवसभर पुनर्वसू नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू होऊन ते शुक्रवारी पहाटे ६ वाजून २२ मिनिटांपर्यंतच राहणार आहे. त्यामुळे पंचांगकर्त्यांनी गुरुपुष्यामृतयोग शुक्रवारी पहाटसमयी अवघ्या तीन तासांसाठीच सांगितलेला आहे. आता गुरुपुष्यामृतयोगावरच सुवर्णखरेदी करायची तर ग्राहकांना या तीन तासांतच करावी लागणार आहे आणि त्यासाठी सराफी पेढ्या पहाटेच खुल्या ठेवाव्या लागणार आहेत. तसे पाहिले तर पितृपक्षात कोणतीही शुभ खरेदी केली जात नाही. त्यामुळे या गुरुपुष्यामृतयोगावर पेढ्या खुल्या राहिल्या तरी ग्राहकांचा त्याला कितपत प्रतिसाद लाभेल याबाबत शंकाच आहे. सराफी व्यावसायिकांच्या पंचांगानुसार दि. १८ रोजी गुरुपुष्यामृतयोग असल्याचे म्हटले जात असले, तरी ग्राहकांकडून होणारी खरेदी ही पुनर्वसू नक्षत्रातच होणार आहे.
इन्फो
आज गुरुपुष्यामृतयोग नाही
बुधवारी रात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्र संपून पुनर्वसू नक्षत्र लागले. ते शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पुनर्वसू नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्राचा काहीही संबंध नाही. गुरुवारच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी पुष्य नक्षत्र लागेल आणि ते सूयार्ेदयापर्यंत राहील.
- गिरीश गायधनी, ज्योतिष अभ्यासक

Web Title: For Money Page - Gurupushamrit Yog Suvarn Khedi on Friday morning: Only rehabilitation of Sarafi stairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.