Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनी लाँड्रिंगप्रकरणी १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मनी लाँड्रिंगप्रकरणी १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेत घडलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १२.५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली

By admin | Updated: December 13, 2015 22:58 IST2015-12-13T22:58:07+5:302015-12-13T22:58:07+5:30

बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेत घडलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १२.५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली

In the money laundering case, he has an asset worth Rs 12 crore | मनी लाँड्रिंगप्रकरणी १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मनी लाँड्रिंगप्रकरणी १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

नवी दिल्ली : बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेत घडलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १२.५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. बँकेच्या या शाखेमध्ये विविध कंपन्यांनी खाती उघडून त्याद्वारे ६००० कोटी रुपये विदेशात पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमाअंतर्गत जप्तीची ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात अटक करण्यात आलेले आरोपी कमल कालरा, चंदन भाटिया, संजय अग्रवाल आणि गुरुचरणसिंग यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

Web Title: In the money laundering case, he has an asset worth Rs 12 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.