ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' या मोहीमेला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मोहीमेचा शुभारंभ केला जाणार असून या सोहळ्याला देशविदेशातील कंपन्यांचे १०० मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाचा नारा देत परदेशातील उद्योजकांनी भारतात उत्पादन सुरु करावे असे आवाहन केले होते. यानुसार २५ सप्टेंबर रोजी देशभरात 'मेक इन इंडिया' या मोहीमेचा शुभारंभ केला जाणार आहे. विज्ञान भवनात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मोहीमेचा शुभारंभ होईल.उद्योजकांच्या सोयीसाठी मुंबई, चेन्नई, बंगळुरु या शहरांमध्येही विशेष अभियान राबवले जाईल असेही अधिका-यांनी सांगितले. याशिवाय परदेशांमध्येही ही मोहीम राबवणार असल्याचे अधिका-यांनी नमूद केले. या मोहीमेद्वारे देशाच्या अर्थव्यस्थेला चालना मिळण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील असा विश्वासही अधिका-यांनी व्यक्त केला.