Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी जोड-पान १

मोदी जोड-पान १

संग्रहालयात रमले पंतप्रधान मोदी

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

संग्रहालयात रमले पंतप्रधान मोदी

Modi add-ons | मोदी जोड-पान १

मोदी जोड-पान १

ग्रहालयात रमले पंतप्रधान मोदी
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना आतापर्यंत मिळालेल्या वस्तू ठेवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रदर्शनात चांगलेच रमले. विद्या प्रतिष्ठानला भेट देऊन त्यांनी अभ्यासक्रमांची माहिती घेतली, सीबीएसई स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन केले. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंंतर कृषी विकास प्रतिष्ठानच्या आवारातील आप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन त्यांनी केले. तेथून कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. नेदरलॅँडच्या सहकार्याने विकसित टोमॅटोच्या निर्यातक्षम वाणाची त्यांनी विशेष माहिती घेतली. पवारांच्या निवासस्थानी स्नेह भोजन घेतले. मोदी यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंग, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, नेदरलँडचे राजदूत स्टोईिलंग, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदी या वेळी उपस्थित होते.
———————————

Web Title: Modi add-ons