Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात मोबाईल सेवा महागच

भारतात मोबाईल सेवा महागच

दर ग्राहकालाही फारच ‘स्वस्त’ वाटत असले तरी, आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर ‘महागडे’ आहेत.

By admin | Updated: November 27, 2014 01:42 IST2014-11-27T01:42:15+5:302014-11-27T01:42:15+5:30

दर ग्राहकालाही फारच ‘स्वस्त’ वाटत असले तरी, आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर ‘महागडे’ आहेत.

Mobile service in India is expensive | भारतात मोबाईल सेवा महागच

भारतात मोबाईल सेवा महागच

जागतिक क्रमवारी : भारताचा क्रमांक 83 वा; मकाऊमध्ये सर्वात स्वस्त सेवा उपलब्ध
मनोज गडनीस - मुंबई
प्रतिसेकंद 1 पैसा आणि प्रतिमिनीट 2क् पैसे अशा आकर्षक जाहिरातींद्वारे भारतात मोबाईल कंपन्या ग्राहकाला आकर्षित करत असल्या आणि हे दर ग्राहकालाही फारच ‘स्वस्त’ वाटत असले तरी, आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर ‘महागडे’ आहेत. एवढेच नव्हे तर मोबाईलचा प्रसार झालेल्या सुमारे 166 देशांच्या यादीत मोबाईल सेवेबाबत भारताचा क्रमांक तब्बल 83 वा असल्याची रंजक माहिती उजेडात आली आहे. 
जे ग्राहक पोस्टपेड पद्धतीचे मोबाईल कनेक्शन वापरतात, त्या भारतीयांच्या दरडोई मासिक उत्पन्नापैकी 2.1 टक्के रक्कम ही त्याच्या मोबाईल बिलापोटी खर्च होते. हा खर्च केवळ कॉल करणो आणि एसएमएस एवढय़ापुरताच मर्यादित आहे. यामध्ये वॉटस् अॅप, फेसबुकसाठी लागणारा इंटरनेटचा खर्च गृहीत धरण्यात आलेला नाही. इंटरनेटकरिता उत्पन्नाच्या 2.81 टक्के इतकी रक्कम खर्ची पडते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर यापेक्षा ही रक्कम किमान पाच पट अधिक आहे. 
मोबाईल सेवा जेव्हा भारतात सादर झाली त्यावेळी पोस्टपेडपेक्षा प्रीपेड मोबाईल कार्ड हाच पर्याय अधिक लोकप्रिय होता. मात्र, पोस्टपेड श्रेणीतील मोबाईल सेवेत भारतीय सेवा ही जगात 95 व्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ, त्या अगोदरच्या 94 देशांतील प्रीपेड सेवा ही भारतापेक्षा स्वस्त आहे. प्रीपेडधारक मोबाईल ग्राहकाचा मासिक उत्पन्नाच्या 3.2 टक्के खर्च हा प्रीपेडवर होतो, तर प्रीपेडवरून इंटरनेट वापरणा:या ग्राहकांची तर मासिक उत्पन्नाच्या 4.2 टक्के रक्कम त्याकरिता खर्ची पडते. 
भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे, भारतात जरी स्वस्त चिनी हँडसेटचा बोलबाला असला तरी त्याच चीनमधील मोबाईल सेवा मात्र भारताच्या दुप्पट असल्याचे या सव्रेक्षणाद्वारे दिसून आले आहे. भारतीयांचे सरासरी मासिक मोबाईल बिल हे 2.91 अमेरिकी डॉलर इतके असल्याचे निदर्शनास आले असून चीनमध्ये बिलाचा हाच खर्च सरासरी 4.क्6 अमेरिकी डॉलर इतका असल्याची नोंद झाली आहे. 
83 व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पुढे स्वस्त मोबाईल सेवा देण्यात अमेरिका, सिंगापूर, हॉँगकॉँग, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यासारख्या काही प्रमुख देशांचा समावेश आहे. मकाऊमध्ये मोबाईल सेवा ही सर्वात स्वस्त असल्याचे दिसून आले आहे. तिथे मासिक खर्च हा केवळ 1.क्6 अमेरिकी डॉलर इतका खर्च होत
आहे. 
 
च्हा अहवाल केवळ क्रमवारी किंवा खर्चाची आकडेवारी सादर करणार नाही तर तो जागतिक बँकेचा दरडोई उत्पन्न मोजण्याचा जो फॉम्यरुला निश्चित केला आहे, त्यानुसार तयार करण्यात आला आहे. यानुसार, देशाचे ठोकळ वार्षिक उत्पन्न भागीले देशाची लोकसंख्या अशा फॉम्यरुल्याने हिशेब करण्यात आला आहे.
 
च्हा हिशेब लक्षात घेता, प्रतिवर्षी प्रतिमाणशी मूल्यांकन हे 5,35क् डॉलर इतके होते. याचा आणखी बारकाईने हिशेब केल्यास प्रतिमाणशी मासिक मूल्यांकन हे 87 डॉलरच्या आसपास होते. या निकषाच्या आधारे मोजणी झाली असून, सव्रेक्षण करणा:या संस्थेच्या मते यामुळे खर्चाची मोजणी अधिक अचूक पद्धतीने साधली जाते. 

 

Web Title: Mobile service in India is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.