Lokmat Money > बिझनेस न्यूज > वीस वर्षांत प्रथमच घटली मोबाईल विक्री

वीस वर्षांत प्रथमच घटली मोबाईल विक्री

मोबाईल फोन भारतात दाखल झाल्यापासून वर्षाकाठी विक्रीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या हँडसेट बाजारपेठेला गेल्या २० वर्षांत प्रथमच धक्का बसला

By admin | Updated: May 19, 2015 11:16 IST2015-05-18T23:40:18+5:302015-05-19T11:16:55+5:30

मोबाईल फोन भारतात दाखल झाल्यापासून वर्षाकाठी विक्रीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या हँडसेट बाजारपेठेला गेल्या २० वर्षांत प्रथमच धक्का बसला

Mobile sales decreased for the first time in 20 years | वीस वर्षांत प्रथमच घटली मोबाईल विक्री

वीस वर्षांत प्रथमच घटली मोबाईल विक्री

मुंबई : मोबाईल फोन भारतात दाखल झाल्यापासून वर्षाकाठी विक्रीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या हँडसेट बाजारपेठेला गेल्या २० वर्षांत प्रथमच धक्का बसला असून हँडसेटच्या विक्रीत १४ टक्क्यांची घसघशीत घसरण नोंदली गेली आहे. मोबाईल क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही रंजक माहिती पुढे आली आहे.
या सर्वेक्षणातील काही निरिक्षणांनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या सहामहीत केवळ पाच बड्या कंपन्यांची एकूण ८ ते १० मॉडेल्स बाजारात आली. बाजारात आलेली ही नवी मॉडेल्स केवळ त्यापूर्वी त्याच धाटणीच्या मॉडेल्सचे सुधारित व्हर्जन होते. त्यात वैशिष्ट्यपूर्ण असे काहीही नव्हते. या उलट जर गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर, अर्थात भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनच्या आगमनानंतरच्या काळाचा आढावा घेतला तर अक्षरश: प्रत्येक तिमाहीत जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांनी किमान ६ ते ७ म्हणजे वर्षाकाठी १५० च्या आसपास बाजारात आल्याचे दिसून आले. तसेच, यापैकी किमान ७० टक्के हँडसेट हे नव्या तंत्राने सज्ज असे होते. परंतु, गेल्या सहामहीत नव्या तंत्राचा अंतर्भाव असलेले कोणतेही नवे फारसे हँडसेट बाजारात आले नाहीत. त्यामुळे हँडसेट विक्री घटण्यामागचे हे एक प्रमुख कारण मानले गेले.
सत्ता पालटानंतर गेल्या आर्थिक वर्षाकरिताचा जो अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला होता, त्यामध्ये भारतीय मोबाईल हँडसेट कंपन्यांना चालना देण्यासाठी परदेशी कंपन्यांच्या किंवा आयात हँडसेटच्या शुल्कात ६ टक्क्यांवरून १२ टक्के अशी वाढ करण्यात आली.

४भारतीय बाजारपेठेत आजच्या घडीला परदेशी स्मार्टफोनची हिस्सेदारी ही ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे; परंतु या हँडसेटवरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे हँडसेटच्या दरात वाढ झाली आहे.
४याचाही फटका काही प्रमाणात विक्रीला बसल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Mobile sales decreased for the first time in 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.