Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरभरती करण्यास मनसे शिक्षक सेनेचा विरोध

नोकरभरती करण्यास मनसे शिक्षक सेनेचा विरोध

एनडीएसटी संचालक वाद : उपनिबंधकांना पत्र

By admin | Updated: November 4, 2014 00:11 IST2014-11-03T23:34:50+5:302014-11-04T00:11:43+5:30

एनडीएसटी संचालक वाद : उपनिबंधकांना पत्र

MNS teachers' army opposes the recruitment | नोकरभरती करण्यास मनसे शिक्षक सेनेचा विरोध

नोकरभरती करण्यास मनसे शिक्षक सेनेचा विरोध

एनडीएसटी संचालक वाद : उपनिबंधकांना पत्र
नाशिक : नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत नवीन नोकरभरती व नवीन शाखा व गाळे खरेदीस परवानगी देऊ नये, या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार सहकार कायदा व कलमानुसार चालत नसून सोसायटीचे व सभासदांचे हित राखले जात नाही. याबाबत सहकार विभागाला व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मनसे शिक्षकेतर सेनेच्या वतीने ३० निवेदने देण्यात आली. तसेच सोसायटीकडे फी भरण्याची तयारी दाखवूनही माहिती मिळत नसल्याचे मनसे शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सोसायटीला नवीन नोकरभरतीची परवानगी दिलेली नसतानाही संचालक मंडळाने बेकायदेशीर जाहिरात देऊन हुकूमशाही पद्धतीने दोन कर्मचारी कामावर रुजू करून घेतलेले आहेत. तरी त्यांच्या वेतन व इतर भत्त्यांवर होणारा खर्च संचालक मंडळाकडून त्वरित वसूल करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे पुरुषोत्तम रकीबे, प्रकाश वाघ, वासुदेव बधान, बी. एम. निकम, एकनाथ पाटील, रघुनाथ हळदे, सुभाष पवार, सखाराम जाधव, नरेंद्र वड, वाय. झेड. पाटील, हिरालाल परदेशी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: MNS teachers' army opposes the recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.