Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिनिटभराची मालकी; गुगलचे सन्मयला ८ लाख

मिनिटभराची मालकी; गुगलचे सन्मयला ८ लाख

केवळ ६० सेकंदांसाठी म्हणजेच अवघ्या एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉम डोमेनचा मालक बनलेल्या सन्मय वेद याला सर्च इंजिन गुगलने आठ लाख रुपये दिले.

By admin | Updated: February 1, 2016 02:21 IST2016-02-01T02:21:02+5:302016-02-01T02:21:02+5:30

केवळ ६० सेकंदांसाठी म्हणजेच अवघ्या एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉम डोमेनचा मालक बनलेल्या सन्मय वेद याला सर्च इंजिन गुगलने आठ लाख रुपये दिले.

Minute ownership; Google's 8 million rubles | मिनिटभराची मालकी; गुगलचे सन्मयला ८ लाख

मिनिटभराची मालकी; गुगलचे सन्मयला ८ लाख

 न्यूयॉर्क : केवळ ६० सेकंदांसाठी म्हणजेच अवघ्या एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉम डोमेनचा मालक बनलेल्या सन्मय वेद याला सर्च इंजिन गुगलने आठ लाख रुपये दिले. सन्मयने ही रक्कम आर्ट आॅफ लिव्हिंग इंडिया फाऊंडेशन या शैक्षणिक उपक्रमाला दान देणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कच्छ क्षेत्रातील मांडवी येथे राहणाऱ्या सन्मय वेद याला गुगल डोमेनचा शोध घेताना गुगल डॉट कॉम खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे लक्षात आले. त्याने हे डोमेन १२ डॉलरमध्ये विकत घेतलेही. गुगलकडून ही विक्री रद्दबातल केली जायच्या आधी त्याने वेबमास्टर टूल्सपर्यंत पोहोचून ती प्राप्तही केली. सन्मय वेद म्हणाला की, ‘‘मी कधी पैशांबद्दल विचार केला नव्हता.’’
गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘‘आपण सन्मय वेदबद्दल वाचले असेलच. तो केवळ एक मिनिटासाठी का असेना गुगल डोमेन्सवर गुगल डॉट कॉम विकत घेण्यात यशस्वी ठरला. सन्मयला आमच्याकडून अगदी सुरुवातीला रोख ६००६.१३ डॉलरचा पुरस्कार होता. जेव्हा त्याने ही रक्कम दान करायचा निर्णय जाहीर केला तेव्हा आम्ही ही रक्कम दुपट्ट केली.

Web Title: Minute ownership; Google's 8 million rubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.