Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात किरकोळ वाढ

शेअर बाजारात किरकोळ वाढ

पाश्चात्य देशांत वर्षअखेरीच्या सुट्या सुरू असल्याने बाजारात रोकड प्रवाह घटल्याने व ठोस व्यवहार न झाल्याने आज स्थानिक शेअर बाजारात अल्प वाढ नोंदली गेली.

By admin | Updated: December 30, 2014 23:33 IST2014-12-30T23:33:03+5:302014-12-30T23:33:03+5:30

पाश्चात्य देशांत वर्षअखेरीच्या सुट्या सुरू असल्याने बाजारात रोकड प्रवाह घटल्याने व ठोस व्यवहार न झाल्याने आज स्थानिक शेअर बाजारात अल्प वाढ नोंदली गेली.

Minor growth in the stock market | शेअर बाजारात किरकोळ वाढ

शेअर बाजारात किरकोळ वाढ

मुंबई : पाश्चात्य देशांत वर्षअखेरीच्या सुट्या सुरू असल्याने बाजारात रोकड प्रवाह घटल्याने व ठोस व्यवहार न झाल्याने आज स्थानिक शेअर बाजारात अल्प वाढ नोंदली गेली. दिवसभरात बाजारात चढ-उतार होत राहिल्याने जवळपास सर्वच प्रमुख निर्देशांक अगोदरच्या पातळीवर कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८ अंकांच्या नाममात्र वाढीसह २७,४०३.५४ अंकावर बंद झाला.
विदेशी गुंतवणूकदारांनी वर्षअखेरीच्या उत्सवांदरम्यान नफेखोरी केली. यामुळे बाजारात सुरुवातीची तेजी राहिली नाही. प्रारंभीच्या व्यवहारात ८२ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स ७.८१ अंकांच्या तेजीसह २७,४०३.५४ अंकावर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स १८७.१२ अंकांनी मजबूत झाला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,२६८.२५ आणि ८,२२०.५५ अंकांदरम्यान राहिल्यानंतर १.९५ अंकांनी वाढून ८,२४८.२५ अंकावर बंद राहिला.
भेल, एनटीपीस, डॉक्टर रेड्डीज व अ‍ॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजार सलग तिसऱ्या दिवशी बंद झाला. मंत्रिमंडळाने प्रमुख क्षेत्रांत भूमी अधिग्रहण सुलभ करण्याबाबत अध्यादेश काढल्याने सुरुवातीला बाजाराचा मूड चांगला राहिला.
चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व तैवान येथील शेअर निर्देशांक ०.५ ते १.५७ टक्के यादरम्यान घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्सवरील ३० पैकी ११ कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. यात भेल, एनटीपीसी, डॉक्टर रेड्डीज लॅब, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.
गुंतवणूकदार सावध भूमिकेत
रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक यांनी सांगितले की, ‘शेअर बाजारात चढ-उताराचा कल राहिल्याने गुंतवणूकदार सावध भूमिकेत राहिले.’ अन्य आशियाई बाजारातही नरमीचा कल राहिला. याचाही स्थानिक बाजारावर परिणाम झाला.(प्रतिनिधी)

४पहिल्यांदाच रुपया मंगळवारी २९ पैशांनी वधारून डॉलरमागे ६३.३८ रुपयांवर स्थिरावला. निर्यातदारांनी नव्याने डॉलरची विक्री केली आणि देशात परकीय निधीची आयात झाल्यामुळे रुपयाचे मोल वाढले. विदेशी चलन विनिमय बाजारपेठेत रुपया ६३.७२ वर सुरू झाला व ६३.६७ वर बंद झाला. त्यानंतरही रुपया ६३.७९ पर्यंत घसरला.
 

Web Title: Minor growth in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.