नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन २० हजार रुपये मिळू शकेल. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या किमान वेतनात सुमारे १९ टक्क्यांची ही वाढ असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतन १८ हजार रुपये असावे अशी शिफारस करण्यात आली असून व कर्मचारी संघटनांनी ते २६ हजार रुपये असावे अशी मागणी केली
आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली सचिवांची विशेषाधिकार समिती किमान वेतन १८ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपयांचा प्रस्ताव मांडण्याचे नियोजन करीत असल्याचे वृत्त आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार येत्या जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे. शिफारशींबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संयुक्त सल्लागार यंत्रणेने ज्या वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत त्यांचा विचार सचिवांची ही समिती करील. वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत लष्कर, नौदल आणि हवाई दलानेही ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्यांचेही ही समिती नव्याने विश्लेषण करील.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही नुकत्याच एका मुलाखतीत या तिन्ही दलांनी घेतलेल्या शंकांचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते. या विशेष समितीत १२ सचिव असून तिची स्थापना २७ जानेवारी रोजी करण्यात आली होती.
किमान वेतन होणार २० हजार
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन २० हजार रुपये मिळू शकेल. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या किमान वेतनात सुमारे १९ टक्क्यांची ही वाढ असेल.
By admin | Updated: April 4, 2016 02:40 IST2016-04-04T02:40:02+5:302016-04-04T02:40:02+5:30
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन २० हजार रुपये मिळू शकेल. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या किमान वेतनात सुमारे १९ टक्क्यांची ही वाढ असेल.
