मिहान-सेझ...२ ...
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30

मिहान-सेझ...२ ...
>डिफेन्स उत्पादने क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणारअंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृष्टी असलेल्या नेत्याची उपमा दिली. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळे रिलायन्स-एडीएजीच्या प्रकल्पाला ६९ दिवसांत जागेचे पत्र मिळाले. अंबानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिफेन्स क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्यानंतर रिलायन्स एडीएजीने या क्षेत्रात लक्ष केंद्रित केले. यामुळे डिफेन्सला लागणाऱ्या ७० टक्के उत्पादनांची आयात थांबून देश या क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहे. नागपूरचा औद्योगिक विकास होणारदेवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल अंबानी यांच्या समूहाने डिफेन्स क्षेत्रातील पहिला प्रकल्प मिहान-सेझमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी मदतीचे आश्वासन दिले. अंबानी हे मिहान-सेझचे ब्रॅण्ड ॲम्बेसडर आहेत. रिलायन्स-एडीएजी कंपनी ही नागपूरच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बोईंगने उभारलेला एअर इंडिया एमआरओ, कतार एअरवेजची नागपूर-दोहा सेवा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय एतिहाद एअरलाईन्स कार्गो सेवा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० हजार युवकांना रोजगारप्रारंभी प्रास्ताविकात तानाजी सत्रे यांनी मिहान प्रकल्पाची माहिती दिली. रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडने जागेसाठी २४ जुलैला आवेदन दिले आणि ११ ऑगस्ला २८९ एकर जागा देण्यावर निर्णय घेण्यात आला. ६५०० कोटी रुपये अर्थात १ बिलियन डॉलर गुंतवणुकीतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष २० हजार लोकांना रोजगार मिळेल. प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांना काम मिळेल. रिलायन्स डिफेन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष राजेश घिंगरा यांनी कंपनीची माहिती दिली. संरक्षण खात्याला लागणारी ६० ते ७० टक्के उपकरणांची आयात करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने हेलिकॉप्टर, अंतरिक्षयान आणि सुट्या भागांची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठा राहील.कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सीतारत्तू व जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी केले तर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आभार मानले.