मुंबई : शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर आता म्युच्युअल फंड (एमएफ) कंपन्याही जोमाने बाजारात उतरल्या असून, जूनच्या महिन्यात या कंपन्यांनी सुमारे ३३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती उजेडात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, देशातील ४४ म्युच्युअल फंड कंपन्या शेअर बाजारात जोमाने सक्रिय झाल्या असून अपेक्षेप्रमाणे या कंपन्यांनी सर्वाधिक पसंती ही इक्विटीच्या घटकाला दिली आहे. डेट आणि अन्य पर्यायांतही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. प्रत्यक्ष इक्विटीमध्ये १०५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच एका महिन्यात इतकी भरीव गुंतवणूक झाली आहे. इक्विटी घटकांत गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड कंपन्यांनी प्रामुख्याने सेन्सेक्स कंपन्यांनाच पसंती दिली असून या कंपन्यांनी केलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये सुमारे ५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. स्थिर सरकार स्थापन झाल्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे. (प्रतिनिधी)
एमएफ कंपन्यांनी केली मोठी खरेदी
तेजीच्या पार्श्वभूमीवर आता म्युच्युअल फंड (एमएफ) कंपन्याही जोमाने बाजारात उतरल्या असून, जूनच्या महिन्यात या कंपन्यांनी सुमारे ३३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती उजेडात आली आहे.
By admin | Updated: July 7, 2014 04:53 IST2014-07-07T04:53:52+5:302014-07-07T04:53:52+5:30
तेजीच्या पार्श्वभूमीवर आता म्युच्युअल फंड (एमएफ) कंपन्याही जोमाने बाजारात उतरल्या असून, जूनच्या महिन्यात या कंपन्यांनी सुमारे ३३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती उजेडात आली आहे.
