पळीत तंत्र कारागिराचा खून परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील तंत्र कारागिराचा सहकार्याने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. चंद्रकांत दगडू पाटील (५१) असे मृताचे नाव असून, शरद भिवाजी लांडगे याला अटक करण्यात आली आहे. बसस्थानक परिसरात रविवारी रात्री उशीरा ५० वर्षे वयाच्या व्यक्तिचा मृतदेह आढळून आला़ हा मृतदेह चंद्रकांत पाटील यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी सरला चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पाटील व लांडगे कोळसा विभागात एकत्रच काम करत असत. त्यांच्यात नेहमी खटके उडत. पाटील हे नेहमी मानसिक त्रास देत असत. रविवारी तो अतिशय खालच्या स्तराला जाऊन बोलला त्यामुळे त्याची हत्या केल्याची कबुली लांडगे याने दिल्याचे निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कर्नाटकच्या वसुली पथकाच्या मारहाणीत मुकादमाचा मृत्यूधारूर (जि. बीड) : थकित पैसे देण्याची मागणी करीत कर्नाटक येथील निराणी शुगर कारखान्याच्या वसुली पथकाने जबर मारहाण केल्याने मुकादमाचा मृत्यू झाला़ अच्युत आप्पाराव सुरवसे (४५) असे त्याचे नाव असून, ही घटना जहांगीरमोहा येथे रविवारी घडली़ अच्युत सुरवसे यांनी कारखान्यासोबत मजूर पुरविण्याचा करार केला होता़ कारखान्याचे सुरवसे यांच्याकडे दोन लाख रुपये थकित होते़ कारखान्याचे पथक मुकादमाच्या शेतातील घरी आले़ यावेळी पथकातील लोकांनी सुरवसे यांना मारहाण करुन अपहरणाचा प्रयत्न केला़ यावेळी सुरवसे यांनी आरडाओरड केली. त्यानंतर पथकातील एकाने ढकलून दिल्याने सुरवसे हे लगतच्या विद्युत खांबावर आदळले़ विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अच्युत यांचे बंधू नारायण सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धारुर पोलिसात संगाप्पा हिपरगी, महादेव पवार, दयानंद घोरपडे, बादशहा मोहम्मद बैजलगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला़ (प्रतिनिधी)
परळीत औष्णिक केंद्रातील तंत्र कारागिराचा खून
परळीत तंत्र कारागिराचा खून
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:31+5:302014-08-25T21:40:31+5:30
परळीत तंत्र कारागिराचा खून
