नवी दिल्ली : घरगुती प्रवासी कारच्या विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीने आपला पहिला क्रमांक नोव्हेंबर महिन्यातही कायम ठेवला आहे. विकल्या गेलेल्या प्रत्येक १0 कारमध्ये ६ कार मारुतीच्या आहेत.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबॉईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. टॉप टेन कारमध्ये आॅल्टो पहिल्या स्थानी कायम आहे. नोव्हेंबरमध्ये २१,९९५ आॅल्टो गाड्या विकल्या गेल्या. कॉम्पॅक्ट सेडान गटातील डिझायर ही दुसऱ्या स्थानी आहे. कंपनीने नोव्हेंबरमध्ये १५,४६३ डिझायर विकल्या आहेत. कॉम्पॅक्ट हॅचबॅक गटातील वॅगनआर तिसऱ्या स्थानी आहे.
ह्युंदाईची ग्रँड आय-१0 ही गाडी चौथ्या स्थानावर राहिली. या मॉडेलच्या १२,८९९ गाड्या नोव्हेंबरमध्ये विकल्या गेल्या. मारुतीची प्रीमियम हॅचबॅक स्विफ्ट पाचव्या स्थानावर राहिली. सहाव्या स्थानावर ह्युंदाईची आय-२0, सातव्या स्थानावर बेलेनो, हॅबॅक इयोन आठव्या स्थानावर राहिली. मारुतीची सेलेरियो नवव्या स्थानावर असून महिंद्रा अँड महिंद्राची बोलेरो दहाव्या स्थानावर आहे.
मारुतीच नंबर वन
घरगुती प्रवासी कारच्या विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीने आपला पहिला क्रमांक नोव्हेंबर महिन्यातही कायम ठेवला आहे. विकल्या गेलेल्या प्रत्येक १0 कारमध्ये ६ कार मारुतीच्या आहेत.
By admin | Updated: December 28, 2015 00:31 IST2015-12-28T00:31:26+5:302015-12-28T00:31:26+5:30
घरगुती प्रवासी कारच्या विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीने आपला पहिला क्रमांक नोव्हेंबर महिन्यातही कायम ठेवला आहे. विकल्या गेलेल्या प्रत्येक १0 कारमध्ये ६ कार मारुतीच्या आहेत.
