Lokmat Money > बिझनेस न्यूज > मारुती सुझूकी, टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या

मारुती सुझूकी, टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर इंफ्रास्ट्रक्‍चर सेस (उपकर) लावल्याने मारुती सुझुकीने आणि टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या आहेत

By admin | Updated: March 3, 2016 15:32 IST2016-03-03T14:56:48+5:302016-03-03T15:32:48+5:30

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर इंफ्रास्ट्रक्‍चर सेस (उपकर) लावल्याने मारुती सुझुकीने आणि टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या आहेत

Maruti Suzuki, Tata Motors raised prices of cars | मारुती सुझूकी, टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या

मारुती सुझूकी, टाटा मोटर्सने कारच्या किंमती वाढवल्या

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३ - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर इंफ्रास्ट्रक्‍चर सेस (उपकर) लावल्याने मारुती सुझुकीने कारच्या किंमती वाढवल्या आहेत. कारच्या किमतीत 1,441 ते 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती मारुती सुझूकीने दिली आहे. सरकारने बजेटमध्ये कारवर 4 टक्क्यांपर्यंत इंफ्रा सेस लावला आहे. टाटा मोटर्स आणि हुंडाईने याअगोदरच कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. 
 
टाटा मोटर्सने कारच्या किंमतींमध्ये 35 हजारांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. 2000 पासून ते 35 हजारापर्यंत किंमती वाढवण्यात येणार आहेत. गाड्यांच्या मॉडेल्सवर त्यांची किंमतवाढ ठरवण्यात येणार आहे. 
 
छोट्या वाहनांवर इंफ्रास्ट्रक्‍चर सेस 1 टक्का असल्याने ऑल्टोच्या किंमतीत 3500 रुपये वाढ होण्याची शक्यता होती. मात्र मारुतीने आपली सर्वात स्वस्त कार ऑल्टोच्या किंमतीत फक्त 1,441 रुपयांची वाढ केली आहे. स्‍मार्ट हायब्रिड मॉडेल्‍स सोडून इतर सर्व मॉडेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.  1,441 ते 34,494 पर्यंत कारच्या किंमती वाढणार असल्या तरी नेमक्या कोणत्या गाड्यांची किंमत वाढणार आहे हे कंपनीने अजून स्पष्ट केलेलं नाही.
 

Web Title: Maruti Suzuki, Tata Motors raised prices of cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.