नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात मारुती-सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या कंपन्यांच्या कारविक्रीत वाढ झाली आहे. मारुती-सुझुकीची कारविक्री ८.७ टक्क्यांनी वाढली आहे.
फेब्रुवारीत मारुती-सुझुकीने १,१८,५५१ गाड्यांची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा १,०९,१०४ गाड्या इतका होता. कंपनीने सांगितले की, देशांतर्गत बाजारात कारविक्रीत ८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. १,०७,८९२ वाहने कंपनीने देशात विकली. गेल्या वर्षी ९९,७५८ वाहनांची विक्री झाली होती. वाहन निर्यातीत १४ टक्के वाढ झाली. १0,६५९ वाहनांची निर्यात कंपनीने केली. गेल्या वर्षी ९,३४६ वाहनांची निर्यात करण्यात आली होती.
ह्युंदाईची कारविक्री २.४ टक्क्यांनी वाढली आहे. ४७,६१२ वाहने कंपनीने विकली. गेल्या वर्षी याच महिन्यात ४६,५0५ वाहनांची विक्री झाली होती. देशांतर्गत बाजारात ३७,३0५ वाहने विकली गेली. गेल्या वर्षी ३४,00५ वाहने विकली गेली होती. होंडाच्या कारविक्रीत १६ टक्क्यांची वाढ झाली. १६,९0२ गाड्या कंपनीने फेब्रुवारीत विकल्या. गेल्या वर्षी कंपनीने १४,५४३ गाड्या विकल्या होत्या. १,११९ वाहनांची निर्यातही कंपनीने केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत १0 टक्क्यांची घट झाली. ३८,0३३ वाहने कंपनीने विकली. गेल्या वर्षी ४२,१६६ वाहनांची विक्री झाली होती.
बजाज आॅटो आणि हीरो मोटोकॉर्प या मोटारसायकल उत्पादक कंपन्यांची विक्री घटली. बजाज आॅटोच्या विक्रीत २१ टक्क्यांची घट झाली आहे. २,१६,0७७ गाड्या कंपनीने विकल्या.
गेल्या वर्षी २,७३,३२३ गाड्या विकल्या गेल्या होत्या. हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत ३.८ टक्के घट झाली. ४,८४,७६९ गाड्यांची कंपनीने विक्री केली.
टिव्हीएस मोटारसायकलसींची विक्री मात्र १५.१४ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या १,७७,६६२ गाड्या विकल्या गेल्या.
मारुती, ह्युंदाई, होंडाची कारविक्री वाढली
फेब्रुवारी महिन्यात मारुती-सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या कंपन्यांच्या कारविक्रीत वाढ झाली आहे. मारुती-सुझुकीची कारविक्री ८.७ टक्क्यांनी वाढली आहे.
By admin | Updated: March 3, 2015 00:37 IST2015-03-03T00:37:24+5:302015-03-03T00:37:24+5:30
फेब्रुवारी महिन्यात मारुती-सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या कंपन्यांच्या कारविक्रीत वाढ झाली आहे. मारुती-सुझुकीची कारविक्री ८.७ टक्क्यांनी वाढली आहे.
