मुंबई : गाडीच्या उजव्या दरवाजातील लॅचमध्ये आलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मारुती कंपनीने आपल्या लोकप्रिय अशा अल्टो ८०० आणि अल्टो के १० या दोन मॉडेलमधील सुमारे ३३ हजार ०९८ गाड्या परत मागवल्या
आहेत.
कंपनीने या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ८ डिसेंबर २०१४ ते १८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीमधील या गाड्या असून या गाड्यांच्या उजव्या दरवाज्याती लॉकिंग यंत्रणेत काही त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय घेतला
आहे. अर्थात, या गाड्या तूर्तास जरी रस्त्यावरून धावत असल्या तरी प्रवाशांना याचा कोणताही फटका बसणार नाही अथवा त्रास होणार नाही, परंतु तांत्रिक दोष दूर करायचा असल्यामुळे त्या परत मागवल्या असल्याचे कंपनीने कळविले
आहे. (प्रतिनिधी)
३३ हजार सदोष गाड्या मारुतीने परत मागवल्या
गाडीच्या उजव्या दरवाजातील लॅचमध्ये आलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मारुती कंपनीने आपल्या लोकप्रिय अशा अल्टो ८००
By admin | Updated: March 10, 2015 23:59 IST2015-03-10T23:59:16+5:302015-03-10T23:59:16+5:30
गाडीच्या उजव्या दरवाजातील लॅचमध्ये आलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मारुती कंपनीने आपल्या लोकप्रिय अशा अल्टो ८००
