चळगाव: अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे र्शावण मासानिमित्त मल्लिकार्जुन मंदिरात कलबुर्गी शरणबसवेश्वरांचे पुराण सुरू असून, यादरम्यान शरणबसवेश्वरांच्या विवाह सोहळा प्रसंगामध्ये चंद्रकांत निंगप्पा कोळी व ज्योती सातप्पा कोळी यांचा विवाह करण्यात आला.महिनाभरापासून वे. मुरगेंद्रशास्त्री उमराणी पुराण सांगत आहेत. पी. वाय. पाटील फाउंडेशनतर्फे वधू-वरांना कपडे, मणीमंगळसूत्र, जोडवे याचा खर्च लोकमंगल उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांनी केला. यावेळी सरपंच उमेश पाटील, पंडित पाटील, शशिकांत पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, खंडू वाले, विजय कांबळे, अविनाश इंगुले, संजय अचलेरे, शरणू ख्याडे, गंगाराम ख्याडे, अशोक सुतार, र्शीशैल गाढवे, विजय कोरे, प्रकाश बुगडे, मल्लिनाथ वाले उपस्थित होते. पुराण काळात शेतकरी विशाल नन्ना यांच्यातर्फे अन्नदान सेवा सुरू आहे. विवाह सोहळ्यात सिद्धाराम भंडारकवठे यांनी भोजनाची सोय केली होती. फोटो ओळी::::::::::चपळगाव (ता. अक्कलकोट) येथे सुरू असलेल्या कलबुर्गी शरणबसवेश्वर पुराणादरम्यान चंद्रकांत व ज्योती यांचा विवाह करण्यात आला. यावेळी वे. मुरगेंद्रशास्त्री उमराणी व गावातील पदाधिकारी.
चपळगावमध्ये पुराणात विवाह सोहळा
चपळगाव:
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30
चपळगाव:
