Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रमुख ५ कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले

प्रमुख ५ कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले

सेन्सेक्सवरील प्रमुख १० कंपन्यांपैकी पाचचे एकूण बाजार मूल्य गेल्या आठवड्यात ३१,१६४.६७ कोटी रुपयांनी वाढले

By admin | Updated: September 1, 2014 00:30 IST2014-09-01T00:30:10+5:302014-09-01T00:30:10+5:30

सेन्सेक्सवरील प्रमुख १० कंपन्यांपैकी पाचचे एकूण बाजार मूल्य गेल्या आठवड्यात ३१,१६४.६७ कोटी रुपयांनी वाढले

The market value of the top 5 companies increased | प्रमुख ५ कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले

प्रमुख ५ कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले

नवी दिल्ली : सेन्सेक्सवरील प्रमुख १० कंपन्यांपैकी पाचचे एकूण बाजार मूल्य गेल्या आठवड्यात ३१,१६४.६७ कोटी रुपयांनी वाढले. टीसीएस, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी व आयसीआयसीआय बँक यांच्या भांडवलात वाढ नोंदली गेली. दुसरीकडे कोल इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय व सन फार्मा यांचे बाजार मूल्य कमी झाले.
देशातील सर्वांधिक मूल्य असलेली टीसीएस १० प्रमुख कंपन्यांच्या प्रथम स्थानी राहिली. टीसीएसचे बाजार भांडवल १२,३३०.२ कोटी रुपयांनी वधारून ४,९४,५००.४७ कोटी रुपये झाले. आयटीसीचे बाजार मूल्य ९,१२२.६१ कोटी रुपयांनी वाढून २,८२,९६० कोटी रुपयांवर गेले, तर ओएनजीसीचे भांडवल ७,१०१.०५ कोटींनी वधारून ३,७२,२९२.१५ कोटी रुपये राहिले.
आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य २,२०६.५८ कोटी रुपयांनी वाढून १,८०,०६८.९३ कोटी रुपये झाले, तर आरआयएलचे भांडवल ४०४.२३ कोटींनी उंचावून ३,२३,१४८.५२ कोटी रुपयांवर गेले.
दुसरीकडे एसबीआयचे बाजार भांडवल ४,७१४.६१ कोटींनी घटून १,८३,६९०.५८ कोटी रुपयांवर आले. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्यही ७३०.२३ कोटी रुपयांनी कमी होऊन २,०३,३८१.१८ कोटी रुपये झाले. कोल इंडियाचे भांडवलही ५६८.४७ कोटींनी घसरून २,२५,११५.२३ कोटी रुपयांवर आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)



 

Web Title: The market value of the top 5 companies increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.