नवी दिल्ली : सेन्सेक्स आधारित पाच कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात ३६,९७१.६१ कोटी रुपयांनी घटले. यादरम्यान, ओएनजीसी व सनफार्मा यांना सर्वाधिक फटका बसला.
गेल्या आठवड्यात ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, इन्फोसिस व सनफार्मा यांचे बाजारमूल्य घटले, तर टीसीएस, आयटीसी, एचडीएफसी बँक, एसबीआय व आयसीआयसीआय बँक यांच्या भांडवलात वाढ नोंदली गेली. ओएनजीसीचे भांडवल ११,४२१.७७ कोटींनी घटून ३,६७,१५८.८६ कोटी रुपये, सनफार्माची बाजार क्षमता १०,७४९.०३ कोटी रुपयांनी कमी होऊन १,६६,९१०.२८ कोटी रुपये झाली. कोल इंडियाचे बाजार भांडवल ८,४००.७७ कोटी रुपयांनी घसरून २,२६,०९४.२६ कोटी रुपयांवर आले. इन्फोसिस व रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे भांडवलही घटले.
दुसरीकडे एसबीआयची बाजार क्षमता ८,२२७.२३ कोटी रुपयांनी वधारून १,९६,०२०.२३ कोटी, तर आयटीसीचे बाजारमूल्य ४,४२१.८८ कोटी रुपयांनी वाढून २,८३,५१८.१८ कोटी रुपये झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
५ कंपन्यांचे बाजारमूल्य ३६ कोटी रुपयांनी घटले
सेन्सेक्स आधारित पाच कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात ३६,९७१.६१ कोटी रुपयांनी घटले. यादरम्यान, ओएनजीसी व सनफार्मा यांना सर्वाधिक फटका
By admin | Updated: September 15, 2014 05:01 IST2014-09-15T05:01:22+5:302014-09-15T05:01:22+5:30
सेन्सेक्स आधारित पाच कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात ३६,९७१.६१ कोटी रुपयांनी घटले. यादरम्यान, ओएनजीसी व सनफार्मा यांना सर्वाधिक फटका
