नवी दिल्ली : आजच्या पिढीत ब्रँडेड वस्तूंचे वाढत असलेले आकर्षण व छोट्या शहरांमध्ये उच्च मध्यमवर्गाच्या क्रयशक्तीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे २०१७ मध्ये भारतीय बाजारपेठेतील उलाढाल चार पटीने वाढून ४२० अब्ज डॉलर्सवर जाईल, असे भाकीत ‘असोचेम’ने (द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडिया) केलेल्या अभ्यासात वर्तविले आहे.
फॅशन, आॅटोमोबाईल्ससह लक्झरी वस्तूंच्या बाजारपेठेतही मोठी वृद्धी आगामी काळात बघायला मिळणार आहे. विशेषत: ‘लक्झरी मार्केट’ची २०१७ पर्यंतची उलाढाल १४० कोटी डॉलर्सवरून १८० कोटी डॉलर्सवर जाईल, अशी शक्यता यात वर्तविण्यात आली आहे.
भारतातील ‘लक्झरी मार्केट’ येत्या तीन वर्षात तीनपटीने वाढेल, असे ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले.
भारतात पुढील तीन वर्षांत कोट्यधिशांची संख्या तीन पटीने वाढेल, असे ते म्हणाले. २५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांची संख्या पुढील पाच वर्षांत पाच लाख होईल, तर त्यांची एकूण संपत्ती पाच पटीने वाढून २ हजार ६०० खर्व होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. यात भारत, अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स आणि बेल्जियमची बाजारपेठ, अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या क्रयशक्तीचा अभ्यास करण्यात
आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बाजारपेठेची उलाढाल ४२० अब्ज डॉलर्सवर जाणार
आजच्या पिढीत ब्रँडेड वस्तूंचे वाढत असलेले आकर्षण व छोट्या शहरांमध्ये उच्च मध्यमवर्गाच्या क्रयशक्तीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे
By admin | Updated: January 29, 2015 01:02 IST2015-01-29T01:02:15+5:302015-01-29T01:02:15+5:30
आजच्या पिढीत ब्रँडेड वस्तूंचे वाढत असलेले आकर्षण व छोट्या शहरांमध्ये उच्च मध्यमवर्गाच्या क्रयशक्तीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे
