विधानसभा निवडणुकीत भाजपाने केलेली चांगली कामगिरी, आर्थिक सुधारणा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा, अमेरिकेची जाहीर झालेली समाधानकारक आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांनी पुन्हा सुरु केलेली खरेदी अशा सकारात्मक पाठबळावर चार सप्ताहात होत असलेली घट थांबून मुंबई शेअर बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये बाजारात तेजीचे वातावरण राहिल्यामुळे आगामी वर्षात बाजार सर्वसाधारणपणे तेजीत राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या सुट्यांमुळे बाजारात अवघे तिनच दिवस व्यवहार झाले. यापैकी सर्वच दिवस बाजार तेजीत दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६९३०.२३ ते २६३६८.९४ या दरम्यान खाली वर होत होता. बाजार बंद होताना तोे २६८५१.०५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यापेक्षा २.८४ टक्के म्हणजेच ७४२.५२ अंश वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २३४.८५ अंश म्हणजे ३.०२ टक्के वाढवून ८०१४. ५५ अंशावर बंद झाला. सुमारे महिन्यानंतर निफ्टी पुन्हा ८००० अंशांची पातळी गाठू शकला आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला यश मिळाले या पाठोपाठच डिझेल नियंत्रण मुक्त करण्यात आले. तसेच प्रलंबीत असलेला नैसर्गिक वायु किंमत वाढीचा निर्णयही घेण्यात आला. या दोन निर्णयांमुळे सरकार आर्थिक सुधारणा वेगाने पुढे नेऊ इच्छीते ही बाब अधोरेखित झाली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कोळसा खाणींचा फेर लिलाव करण्याचा कार्यक्रम ही सरकारने जाहिर केला. त्यामुळे सुमारे महिनाभर बाजारापासून दुर असणाऱ्या परकीय वित्तसंस्थांनीबाजारात सक्रीय सहभाग घेऊन खरेदीला प्रारंभ केला. परिणामी बाजारात तेजी परतलेली दिसलीे.
सप्ताहाच्या उत्तरार्धात अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी जाहीर झाली. अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ चांगली होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून आल्याने अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी संचारलेली दिसून आली. युरोपातील शेअर बाजारही तेजीत असलेले दिसून
आले.
गुरुवार दि. २३ रोजी बाजारात विक्रम संवत २०७१ च्या मुहूर्ताचे सौदे झाले. ७५ मिनिटांच्या या विशेष सत्रामध्ये बाजारात तेजी दिसून आली. मुहूर्ताच्या सौद्यांमधील तेजी-मंदी ही बाजाराची आगामी वर्षाची दिशा दर्शविते असे मानले जाते. त्यामुळे बाजारातील ही तेजी आगामी वर्षातील तेजीची सुचना असल्याचे काही दलालांचे म्हणणे आहे. असे असले तरी सप्ताहातील उलाढाल मात्र घटलेली दिसून आली.
मुहूर्ताच्या सौद्यांबरोबर बाजारात तेजी परतली
दिवाळीच्या सुट्यांमुळे बाजारात अवघे तिनच दिवस व्यवहार झाले. यापैकी सर्वच दिवस बाजार तेजीत दिसून आला.
By admin | Updated: October 27, 2014 01:31 IST2014-10-27T01:31:50+5:302014-10-27T01:31:50+5:30
दिवाळीच्या सुट्यांमुळे बाजारात अवघे तिनच दिवस व्यवहार झाले. यापैकी सर्वच दिवस बाजार तेजीत दिसून आला.
