मुंबई : तीन दिवसांच्या घसरणीला ब्र्रेक लावत भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचा मार्ग धरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५ अंकांनी वर चढून २८,0६७.५६ अंकांवर बंद झाला. निफ्टी २0 अंकांनी वाढून ८,४00 अंक ओलांडून पुढे गेला. आयटी आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केल्यामुळे सेन्सेक्सला बळ मिळाले.
ब्रोकरांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली असून, रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६२ रुपयांच्या टप्प्यावर पोहोचले. त्याचा परिणाम म्हणून आयटी आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मागणी वाढली. रुपयाची घसरण झाल्याने आयटी कंपन्यांच्या लाभात वाढ होते. त्यामुळे कंपन्यांचे समभाग तेजीत आले. टिकाऊ ग्राहक वस्तू, रिअल्टी, धातू आणि आॅटो क्षेत्रात नफा वसुली झाली तरी सेन्सेक्स वाढला.
एस अँड पी बीएसई सेन्सेक्स सकाळी उघडला तेव्हा बाजारात मंदीचे वारे होते. वरच्या पातळीवर उघडूनही सेन्सेक्स २७,९१५.२३ अंकांपर्यंत खाली घसरला. आशियाई बाजारातील घसरण प्रामुख्याने त्याला कारणीभूत होती. नंतर मात्र सेन्सेक्सने तेजीचा मार्ग धरला. दिवसअखेरीस ३४.१७ अंकांची अथवा 0.१२ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २८,0६७ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स घसरणीला लागलेला होता. दोन दिवसांत मिळून १४५.0३ अंक त्याने गमावले होते. ही घसरण 0.५१ टक्क्यांची होती.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी १९.६0 अंकांनी वाढून ८,४0१.९0 अंकांवर बंद झाला. ही वाढ 0.२३ टक्के होती.
इन्फोसिस, टीसीएस, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि एसबीआय या कंपन्यांचे समभाग वाढले. त्यामुळे बाजाराला बळ मिळाले. ब्रोकरांनी सांगितले की, गुुरुवारचा दिवस बाजाराच्या दृष्टीने अस्थैर्याचा राहिला. समभाग कधी खाली जात होते, तर कधी वर चढत होते. आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेवढे सातत्यपूर्ण तेजीत राहिले. एचडीएफसी बँक, एल अँड टी, टाटा मोटर्स, सेसा स्टरलाईट, एम अँड एम, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि भेल या कंपन्यांचे समभाग घसरले. (प्रतिनिधी)
बाजार पुन्हा तेजीत
तीन दिवसांच्या घसरणीला ब्र्रेक लावत भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचा मार्ग धरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५ अंकांनी वर
By admin | Updated: November 21, 2014 03:36 IST2014-11-21T03:36:32+5:302014-11-21T03:36:32+5:30
तीन दिवसांच्या घसरणीला ब्र्रेक लावत भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचा मार्ग धरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५ अंकांनी वर
